दलित वस्ती निधी पळविला

By Admin | Updated: August 24, 2016 02:24 IST2016-08-24T02:24:27+5:302016-08-24T02:24:27+5:30

दलित वस्ती विकास योजनेसाठी शासनाने मंजूर केलेला निधी दलित वस्तीत खर्च न करता बिगर दलित वस्त्यांमध्ये पळविण्यात आला आहे.

Dalit inhabitant funds run away | दलित वस्ती निधी पळविला

दलित वस्ती निधी पळविला

निवेदन : देसाईगंज शहरातील प्रकार; नगर परिषद पदाधिकाऱ्यांवर आरोप
देसाईगंज : दलित वस्ती विकास योजनेसाठी शासनाने मंजूर केलेला निधी दलित वस्तीत खर्च न करता बिगर दलित वस्त्यांमध्ये पळविण्यात आला आहे. नगर परिषदेने कायदा धाब्यावर बसविला असून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फतीने सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
अरूण सहारे देसाईगंज ते जयराम राऊत जुनी वडसा रस्ता खडीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यास नगर परिषदेने तांत्रिक मान्यता दिली व यासाठी ५३ लाख ३५ हजार १०० रूपयांचा दलित वस्ती सुधार योजनेचा निधी हे पूर्णत: बेकायदेशिर आहे. या ठिकाणी अनुसूचित जातीच्या एकाही नागरिकाचे घर नाही. दलित वस्ती निधी पळविण्याचे प्रकार देसाईगंज नगर परिषदेत वाढले आहेत. या प्रकारावर आळा घालण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदन देतेवेळी प्रकाश सांगोळे, भीमराव नगराळे, मंगेश शेंडे, क्षीरसागर शेंडे, अभय वासणिक, आशिष शेंडे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Dalit inhabitant funds run away