शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विकासातही सीआरपीएफचा हातभार

By admin | Updated: August 28, 2016 01:32 IST

नक्षल्यांचा सामना करण्याबरोबरच सीआरपीएफ ग्रामीण भागाच्या विकासामध्येही सहकार्य करीत असल्याची माहिती सीआरपीएफचे

पत्रकार परिषद : सीआरपीएफ महानिरिक्षकांची माहिती; पोलिसांना सहकार्य गडचिरोली : नक्षल्यांचा सामना करण्याबरोबरच सीआरपीएफ ग्रामीण भागाच्या विकासामध्येही सहकार्य करीत असल्याची माहिती सीआरपीएफचे महानिरिक्षक राजकुमार यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान दिली. पुढे बोलताना सांगितले की, नक्षल्यांचा सामना करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात पाच बटालियन तैनात करण्यात आल्या आहेत. या सर्व बटालियन स्थानिक पोलिसांना नक्षलविरोधी अभियानात सहकार्य करीत आहेत. कुरखेडा, कोरची या तालुक्यांमधील नक्षलवादाची समस्या कमी झाल्याने देसाईगंजस्थित असलेली कंपनी एटापल्ली येथे हलविण्यात आली आहे. केवळ शस्त्रांच्या भरवशावर नक्षल चळवळ नष्ट होणार नाही. दुर्गम भागात वास्तव्यास असलेल्या आदिवासी नागरिकांचा विकास करावा लागेल. त्यांना आवश्यक असलेल्या सोयीसुविधा पुरवाव्या लागतील. ही बाब लक्षात घेऊन सीआरपीएफच्या वतीने सव्हिक अ‍ॅक्शन प्रोग्राम सुरू करण्यात आले आहे. या प्रोग्राम अंतर्गत दुर्गम भागातील नागरिकांना जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. त्याचबरोबर हातपंप, शौचालय बांधून देऊन त्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न सीआरपीएफच्या वतीने सुरू आहे.पोलीस व सीआरपीएफ यांच्या वतीने सुरू असलेल्या विविध उपक्रमांमुळे व नक्षलविरोधी अभियानामुळे देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात नक्षल चळवळीची आक्रमकता कमी झाली आहे. दुर्गम भागाचा विकास होण्यास सुरूवात झाली असल्याने नक्षल चळवळ आटोक्यात येऊ लागली आहे, अशी माहिती राजकुमार यांनी दिली. यावेळी सीआरपीएफचे डीआयजी दिनेश उनियल, १९२ बटालियनचे कमांडंट मनोजकुमार यांच्यासह सीआरपीएफचे इतर कमांडंट उपस्थित होते.(नगर प्रतिनिधी)