शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

मेंढेबोळी येथील दोन दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:25 IST

आरमोरी तालुक्यातील मेंढेबोळी गावात दारूविक्रीचे प्रमाण अधिक आहे. जवळपास २२ दारूविक्रेते सक्रिय आहेत. परिसरातील गावांनाही येथूनच मोहफुलाच्या दारूचा पुरवठा ...

आरमोरी तालुक्यातील मेंढेबोळी गावात दारूविक्रीचे प्रमाण अधिक आहे. जवळपास २२ दारूविक्रेते सक्रिय आहेत. परिसरातील गावांनाही येथूनच मोहफुलाच्या दारूचा पुरवठा केला जातो. यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. मुजोर दारूविक्रेत्यांना धडा शिकविण्यासाठी आरमोरी पोलीस व मुक्तिपथने संयुक्त कारवाई करण्याचे ठरविले. त्यानुसार, जंगल परिसरात शोधमोहीम राबवून ३ दारूभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. एका ठिकाणाहून ४० लीटर मोहफुलाची दारू व साहित्य जप्त करण्यात आले, तर २५० लीटर मोहसडवा नष्ट करण्यात आला. या प्रकरणी चरणदास मुंगीकोल्हे व तुला मडावी या दोन्ही दारूविक्रेत्यांवर आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी अधिक मजबूत व्हावी व कायद्याची अंमलबजावणी योग्यरीत्या होण्यासाठी १० फेब्रुवारी रोजी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह मुक्तिपथची बैठक झाली होती. त्यामध्ये अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. त्यानुसार, आरमोरी पोलीस व मुक्तिपथने दारूविक्रेत्यांविरोधात धाडसत्र सुरू केले असून, त्रासदायक गावांना लक्ष्य केल्या जाणार आहे. यामुळे दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई आरमोरीचे पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार चौके व त्यांचे सहकारी, तसेच मुक्तिपथ चमूने केली आहे.