न्यायालयाने जामीन फेटाळला

By Admin | Updated: May 2, 2015 01:31 IST2015-05-02T01:31:56+5:302015-05-02T01:31:56+5:30

शिष्यवृत्ती घोटाळ्यातील आरोपी आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी दिगांबर मेंडके व लिपिक संजय सातपुते यांचा ...

The court rejected the bail | न्यायालयाने जामीन फेटाळला

न्यायालयाने जामीन फेटाळला

गडचिरोली : शिष्यवृत्ती घोटाळ्यातील आरोपी आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी दिगांबर मेंडके व लिपिक संजय सातपुते यांचा नियमित जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालायच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावला, अशी माहिती विशेष तपास अधिकारी पोलीस निरिक्षक रवींद्र पाटील यांनी लोकमतला दिली आहे.
गुरूसाई कॉलेज आॅफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट आष्टीच्या प्रकरणातील गुन्ह्यातील आरोपी आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी दिगांबर मेंडके व लिपिक संजय सातपुते यांनी नियमित जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने गुरूवारी सदर जामीन अर्ज फेटाळून लावला.
शिष्यवृत्ती घोटाळ्यातील आरोपी सुरज बोम्मावार व रोहित बोम्मावार या दोघांना पोलीस विद्याभारती कॉलेज आॅफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटच्या गुन्ह्यात कारागृहातून पोलीस शनिवारी ताब्यात घेणार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The court rejected the bail