शहरं
Join us  
Trending Stories
1
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
2
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
5
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
6
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
7
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
8
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
9
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
10
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
11
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
13
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
14
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
15
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
16
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
17
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
18
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
19
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
Daily Top 2Weekly Top 5

अवघड व सर्वसाधारण क्षेत्रातील तफावत दुरूस्त करा!

By admin | Updated: April 6, 2017 01:42 IST

अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्राबाबतची सन २०१६-१७ मध्ये फारच तफावत निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

बीडीओंना निवेदन : प्राथमिक शिक्षक समितीची मागणी एटापल्ली : अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्राबाबतची सन २०१६-१७ मध्ये फारच तफावत निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही तफावत दुरूस्त करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती एटापल्लीने संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती एटापल्ली यांच्याकडे केली आहे. संवर्ग विकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात शिक्षक समितीने म्हटले आहे की, अवघड व सर्वसाधारण क्षेत्राबाबत सन २०१६-१७ मध्ये माहिती अद्यावत करण्यात आली आहे. ज्यात सर्वसाधारण गावे ही रस्त्यावर दर्शविण्यात आली आहे. परंतु संपूर्ण रस्त्यावरील गावे ही सर्वसाधारण क्षेत्रामध्ये दर्शविलेली नाही. तसेच रस्ता नसलेली गावे सुद्धा सर्वसाधारण क्षेत्रात दर्शविलेली आहे. यामध्ये विसंगती असून सदोष माहिती आहे. गट्टा केंद्रातील जि. प. शाळा गट्टा हे अवघड क्षेत्रात दाखविलेले आहेत. तर अडंगे, नेंडेर, सूरजागड ही तालुक्यापासून ३० किमी अंतरावर असून भौगोलिकदृष्ट्या अत्यंत दुर्गम भाग आहे. गट्टा दळणवळण मार्गावर येते. ही गावे अवघड क्षेत्रात का नाही, ही गावे सर्वसाधारण क्षेत्रात कशी मोडतात, हा प्रश्न कायम आहे. अशीच बरीच गावे दळणवळणाची सोय नसलेली असून यामध्ये सरखेडा, कसुरवाही, लिंगोटोला, डुम्मे व एटापल्ली केेंद्रातील बरीच गावे त्याचप्रमाणे बुर्गी केंद्रातील उडेराटोला, आलदंडीटोला, गेदा केंद्रातील वारसेवाडा, दोडी, तांबडा, आलेंगाटोला, एकरा बुर्गी अशी गावे सर्वसाधारण क्षेत्रातून रद्द करून अवघड क्षेत्रात नोंदवून पुन्हा यादी अद्यावत करावी, संपूर्ण तालुका अवघड क्षेत्रात समाविष्ट करावा व १५-२० वर्षांपासून याच तालुक्यात काम करणाऱ्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रात संधी द्यावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे. याबाबत संवर्ग विकास अधिकाऱ्यांमार्फतच सीईओंना निवेदन दिले आहे. (तालुका प्रतिनिधी) एटापल्ली येथील शिक्षण विभागाने अवघड क्षेत्र व साधारण क्षेत्र निश्चिती करून यादी तयार केली असून सदर यादीतील सर्वसाधारण क्षेत्रात मोडणाऱ्या गावांच्या यादीत शासन निर्णयानुसार निश्चिती बरोबर केलेली नाही. शासन निर्णयानुसार तालुका मुख्यालयापासून दूर व डोंगराळ भागात असलेली गावे अवघड क्षेत्रात येत असून अशा गावांचा समावेश साधारण क्षेत्रात निश्चित केला आहे. तसेच नगर पंचायत एटापल्लीमध्ये येणारी गावे वगळता तालुक्यातील संपूर्ण गावे ही अवघड क्षेत्रामध्ये निश्चित करून तशी यादी करावी, अशी आमची प्रशासनाला विनंती आहे. - विनोद करमरकर, तालुकाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, शिक्षक परिषद, एटापल्ली