शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याची नगरसेवकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:25 IST

सिरोंचा नगरपंचायतीच्या १७ नगरसेवकांनी जिल्हा दारूबंदीला पाठिंबा दर्शविला आहे. सोबत कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी शासनाकडे केली आहे. सिरोंचाच्या ...

सिरोंचा नगरपंचायतीच्या १७ नगरसेवकांनी जिल्हा दारूबंदीला पाठिंबा दर्शविला आहे. सोबत कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी शासनाकडे केली आहे. सिरोंचाच्या नगराध्यक्ष मारिया बोल्लमपल्ली, उपाध्यक्ष राजू पेदापल्ली, नगरसेवक संदीप राचर्लावार, सीमा मासल्ला, अब्दुल रफिक, नीलेश गगुरी, मुमताज पठाण, वनिता रालाबंडावार, नरेश अलोणे, सतीश भोगे, सरोजनी मगडी, ईश्वरीबाई बुधावार, नागेश्वर गागापूरवार, रविकुमार रालाबंडावार, विजयकुमार तोकला, संतोषी परसा, सुनीता गट्टू, आदी १७ नगरसेवकांनी समर्थन पत्रावर स्वाक्षरी करून जिल्हा दारूबंदीला पाठिंबा दर्शविला आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी दारूबंदी आवश्यक असून, शासनाने दारूबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली आहे.

आरमोरी नगरपरिषदेच्या १७ नगरसेवकांनी दारूबंदीला पाठिंबा दर्शविला आहे. आतापर्यंत देसाईगंज २१, अहेरी १८, तर कुरखेडा, एटापल्ली शहरातील प्रत्येकी १७ नगरसेवकांनी दारूबंदी मजबूत करण्याची विनंती शासनाकडे केली आहे. आरमोरीचे नगराध्यक्ष पवन नारनवरे, उपाध्यक्ष हैदर पंजवानी, नगरसेवक निर्मला किरमे, सागर मने, गीता सेलोकर, भारत बावनथडे, सुनीता चांदेकर, मिलिंद खोब्रागडे, कीर्ती पत्रे, उषा बारसागडे, सुनीता मने, प्रशांत मोटवानी, प्रगती नारनवरे, माणिक भोयर, सिंधू कापकर, दुर्गा लोणारे, विलास पारधी, आदी नगरसेवकांनी दारूबंदी मजबूत करण्यासाठी शासनाकडे मागणी केली आहे.

बाॅक्स

घोट येथे तंबाखूजन्य पदार्थांची होळी

घोट पोलीस मदत केंद्र व मुक्तिपथ तालुका चमूने गावातील दुकानांची तपासणी करून ४ हजार ५०० रुपयांचा सुगंधित तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले. पोलीस ठाण्याच्या आवारात संपूर्ण तंबाखूजन्य पदार्थांची होळी करून सुगंधित तंबाखूची विक्री न करण्याचे दुकानदारांना बजावण्यात आले. घोट येथील दुकानात सुगंधित तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जात असल्याची माहिती मिळताच मुक्तिपथ व घोट पोलिसांनी संयुक्तरीत्या कारवाई करण्याचे ठरविले. त्यानुसार गावातील चार दुकानांची तपासणी करण्यात आली. या दुकानातून एकूण ४ हजार ५०० रुपयांचा सुगंधित तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. तसेच पुन्हा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करू नका, अन्यथा कारवाई करू, असेही ठणकावून सांगण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या संपूर्ण मुद्देमालाची पोलीस ठाण्याच्या आवारात होळी करण्यात आली. यावेळी पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी रोंढे, पोलीस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगल, तालुका संघटक आनंद इंगळे उपस्थित होते.