शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
3
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
4
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
5
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
6
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
7
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
8
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
9
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
10
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
11
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
12
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
13
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
14
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
15
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
16
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
17
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
18
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
19
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
20
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवडीला यावर्षी कोरोनाचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 05:00 IST

पर्यावरणाचे संतुलन राखण्यात झाडांचा फार महत्त्वाचा वाटा आहे. मात्र वाढती लोकसंख्या, औद्योगिकरण, जलसिंचन प्रकल्प यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. वृक्षतोड झाल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन राज्य शासनाने वृक्ष लागवड योजना सुरू केली होती. त्या योजनेच्या सनियंत्रण व समन्वयाची जबाबदारी वन विभागावर सोपविण्यात आली होती.

ठळक मुद्देउद्दीष्ट घटले : निधीअभावी केवळ ६.८२ लाख वृक्षलागवडीची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. याचा फटका वृक्ष लागवड योजनेलाही बसला आहे. वृक्ष लागवडीसाठी गडचिरोली वनवृत्ताला निधी उपलब्ध करून न दिल्याने यावर्षी केवळ ७ लाख ४ हजार वृक्ष लागवड होणार आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी गडचिरोली वनवृत्तांतर्गत सुमारे ५८ लाख ३६ हजार वृक्ष लागवड केली होती.
पर्यावरणाचे संतुलन राखण्यात झाडांचा फार महत्त्वाचा वाटा आहे. मात्र वाढती लोकसंख्या, औद्योगिकरण, जलसिंचन प्रकल्प यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. वृक्षतोड झाल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन राज्य शासनाने वृक्ष लागवड योजना सुरू केली होती. त्या योजनेच्या सनियंत्रण व समन्वयाची जबाबदारी वन विभागावर सोपविण्यात आली होती. वन विभागालाच सर्वाधिक उद्दिष्ट दिले जात होते.
मागील वर्षी वन विभागाने कृत्रिम वृक्ष लागवड योजनेंतर्गत २८ लाख ८८ हजार तर नैसर्गिक पुनरूत्पादनांतर्गत २९ लाख ४८ हजार असे एकूण ५८ लाख ३६६ हजार रोपांची लागवड केली होती. वृक्ष लागवडीसाठी शासनामार्फत वन विभागाला निधी उपलब्ध करून दिला जात होता. यावर्षीच्या पावसाळ्यात १५ लाख ५८ हजार वृक्ष लागवड केली जाईल. त्यासाठी २३ कोटी ९ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र शासनाने केवळ ३ कोटी १२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. एवढ्या निधीतून १५ लाख वृक्षांची लागवड करणे कठीण असल्याने वन विभागाने वृक्ष लागवडीचे उद्दिष्टही कमी करून ते ७ लाख ४ हजारावर आणले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत वृक्ष लागवड अत्यंत कमी होणार आहे.

गडचिरोली, देसाईगंज, भामरागड विभागाला खो
शासनाकडून वृक्ष लागवडीसाठी पुरेसा निधी प्राप्त झाला नसल्याने गडचिरोली, देसाईगंज आणि भामरागड वन विभागाला यावर्षी वृक्ष लागवडीतून खो देण्यात आला आहे. केवळ आलापल्ली व सिरोंचा वन विभागात वृक्ष लागवड होणार आहे. काळाच्या ओघात काही वृक्ष नष्ट होतात. त्यांच्या जागेवर नवीन वृक्षांची लागवड करावी लागते. याबाबत वन विभाग पुढील १० वर्षांचे नियोजन करते. त्याला कार्यआयोजन असे संबोधले जाते. केवळ यासाठीच शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. यातून ३०३.२५ हेक्टर क्षेत्रावर ६.८२ लाख वृक्षांची लागवड होणार आहे. जिल्हा योजनेतून सिरोंचा वन विभागात २० हेक्टर क्षेत्रावर २२ हजार वृक्ष लागवड होणार आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागcorona virusकोरोना वायरस बातम्या