शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

कंत्राटी रूग्णवाहिका चालकांना आठ महिन्यांपासून वेतनच नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 5:00 AM

जिल्हा परिषदेंतर्गत बाराही तालुक्यात मिळून एकूण ४५ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या आरोग्य केंद्रांतर्गत ३०० वर उपकेंद्र व पथक आहेत. जि.प. प्रशासनातर्फे निविदा काढून कंत्राटी पध्दतीने रूग्णवाहिका चालकाची नियुक्ती करण्यात आली. पदभरतीचे कंत्राट खासगी संस्था किंवा एजन्सीला मिळत असते. हे कंत्राट नागपूर येथील मानव सेवा संस्थेला मिळाले होते.

ठळक मुद्देकोरोना योद्धे आर्थिक विवंचनेत । वेतनासाठी प्रशासनाकडे पैसेच नाही?

प्रतिक मुधोळकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनागेपल्ली : गडचिरोली जिल्हा परिषदेंतर्गत बाराही तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी पध्दतीने रूग्णवाहिका चालक कार्यरत आहेत. कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्या आरोग्य केंद्रस्तरावरील जिल्हाभरातील एकूण ३० रूग्णवाहिका चालकांना नोव्हेंबर २०१९ पासून वेतन न मिळाल्याने हे चालक आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.जिल्हा परिषदेंतर्गत बाराही तालुक्यात मिळून एकूण ४५ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या आरोग्य केंद्रांतर्गत ३०० वर उपकेंद्र व पथक आहेत. जि.प. प्रशासनातर्फे निविदा काढून कंत्राटी पध्दतीने रूग्णवाहिका चालकाची नियुक्ती करण्यात आली. पदभरतीचे कंत्राट खासगी संस्था किंवा एजन्सीला मिळत असते. हे कंत्राट नागपूर येथील मानव सेवा संस्थेला मिळाले होते. मात्र शासनाकडून संस्थेला अद्यापही अनुदान न मिळाल्याने सर्व रूग्णवाहिका चालकांना नोव्हेंबर २०१९ पासून वेतन देण्यात आले नाही.गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासन कोरोना विरूध्द लढाई लढत आहेत. या लढाईत कंत्राटी रूग्णवाहिका चालकही योगदान देत आहेत. कोणत्याही सुरक्षाविना कोरोना संशयीत विलगीकरण केंद्र, विविध रूग्ण तसेच गरोदर मातांना घरापासून ते प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच उपजिल्हा व जिल्हा रूग्णालयात आणून दाखल करीत आहेत. एकीकडे कोरोना योद्ध्याचा सर्वत्र सत्कार करण्यात येत आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या लढाईत योगदान देणाºया कंत्राटी रूग्णवाहिका चालकांचे प्रलंबित वेतन काढण्याबाबत उदासिनता आहे.महिन्याला आठ लाखांचा होतो खर्चप्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर कार्यरत असलेल्या कंत्राटी रूग्णवाहिका चालकांच्या वेतनावर महिन्याला एकूण आठ लाख रुपये खर्च केला जातो. मात्र सद्य:स्थितीत कंत्राट मिळालेल्या संबंधित एजन्सीला एकही रुपयाचा निधी मिळाला नाही. शासनाकडून होणारी थट्टा थांबवून न्याय द्यावा, अशी मागणी चालकांनी केली आहे.सध्या शासनाकडून निधी प्राप्त न झाल्याने कंत्राटी रूग्णवाहिका चालकांचे वेतन होऊ शकले नाही. शासनाकडे पत्र व्यवहार करून पाठपुरावा करण्यात आला असून आताही पाठपुरावा सुरू आहे. आमच्या कोरोना योद्ध्यांची आम्हाला काळजी आहे. शासनाकडून निधी प्राप्त होताच त्यांचे वेतन दिल्या जाईल.- डॉ. शशिकांत शंभरकर,जिल्हा आरोग्य अधिकारी, गडचिरोली

टॅग्स :zpजिल्हा परिषदHealthआरोग्य