शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

२५ ग्रा.पं.त दूषित

By admin | Updated: June 29, 2015 01:58 IST

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यातील ४५६ ग्रामपंचायतीच्या गावात पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे ....

पाणी गुणवत्तेला खो : १५९ ग्रा.पं.ना पिवळे कार्ड वाटपगडचिरोली : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यातील ४५६ ग्रामपंचायतीच्या गावात पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे पावसाळ्यापूर्वी एप्रिल महिन्यात सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील २५ ग्रामपंचायतीच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे तीव्र जोखमीचे ६९ स्त्रोत आढळून आले. या गावांमध्ये नागरिक दूषित पाणी पित आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळ्यात अस्वच्छता व दुषीत पाण्यामुळे जिल्ह्यात अनेक गावांमध्ये साथीच्या रोगाची लागण होते. त्यामुळे ग्रामपंचायतीने पाणी गुणवत्तेबाबत खबरदारी घ्यावी, या उद्देशाने आरोग्य विभागाच्या वतीने वर्षातून दोनदा गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे सर्वेक्षण करण्यात येते. पावसाळ्यापूर्वी एकदा व पावसाळ्यानंतर दुसऱ्यांदा पाणी स्त्रोतांचे सर्वेक्षण केले जाते. जिल्ह्यात दुषीत पाण्यापासून साथीच्या रोगाची लागण होऊ नये, यासाठी आरोग्य विभागावतीने पावसाळ्यापूर्वी एप्रिल महिन्याच्या अखेरीस ४५ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सर्व गावातील पाण्याच्या स्त्रोतांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये ३५ ग्रामपंचायतीच्या गावांमध्ये तीव्र जोखमीचे पाण्यााचे तब्बल ६९ स्त्रोत आढळून आले. १५९ ग्रामपंचायतीच्या गावांमध्ये मध्यम जोखमीचे एकूण ४ हजार ४८४ स्त्रोत आढळून आले. तर २८३ ग्रामपंचायतीच्या गावांमध्ये ६ हजार ८४२ सौम्य जोखमीचे स्त्रोत आढळून आले. तीव्र जोखमीचे स्त्रोत आढळून आलेल्या २५ ग्रामपंचायतीमध्ये देसाईगंज, कुरखेडा, चामोर्शी, मुलचेरा, सिरोंचा पंचायती समितीतील एका ग्रामपंचायतीच्या गावांचा समावेश आहे. तर भामरागड व अहेरी तालुक्यात प्रत्येकी नऊ ग्रा.पं.च्या गावांमध्ये तीव्र जोखमीचे स्त्रोत आढळून आले. या २५ ग्रामपंचायतींना आरोग्य विभागाच्या वतीने लाल कार्ड देण्यात आले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)अनेक ग्रामपंचायती उदासीनपावसाळ्याचे दिवस सुरू होऊनही जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताच्या परिसरात स्वच्छता केली नाही. तसेच ब्लिचिंग पावडरही टाकले नाही. त्यामुळे नागरिकांना दुषीत पाणी प्यावे लागत आहे. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जि.प. गडचिरोलीच्या वतीने २५ मे ते २५ जून २०१५ या कालावधीत साथरोग मुक्त पाणी गुणवत्ता जनजागृती मोहीम राबविण्यात आली. मात्र अनेक ग्रामपंचायतीकडून गुणवत्तापूर्ण व शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्याचे चित्र आहे.