मोदींच्या फलकाला फासलं काळं; काँग्रेसकडून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 21:47 IST2018-10-11T21:46:09+5:302018-10-11T21:47:16+5:30

वाढत्या महागाईविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोर्चा

congress workers puts ink on banner having pm modis photo in gadchiroli | मोदींच्या फलकाला फासलं काळं; काँग्रेसकडून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध

मोदींच्या फलकाला फासलं काळं; काँग्रेसकडून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध

गडचिरोली : जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आज वाढत्या महागाईविरोधात गडचिरोली शहरातून मोर्चा काढण्यात आला. यावेळी एका पेट्रोल पंपवरील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पोस्टरवर काळी शाई फेकून निषेध करण्यात आला. स्वयंपाकाच्या गॅसचे वाढते दर, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात घोषणा दिल्या. या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, हसनअली गिलानी यांनी केलं.  

Web Title: congress workers puts ink on banner having pm modis photo in gadchiroli