शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

आष्टी तालुका निर्मितीसाठी कटिबद्ध

By admin | Updated: September 5, 2016 01:30 IST

आष्टी तालुका निर्मितीची मागणी फार जुनी आहे. तसा प्रस्ताव शासन दरबारी आहे. त्यामुळे जेव्हा नवीन तालुक्यांची निर्मिती होईल.

आमदारांचे आश्वासन : आष्टी ग्राम पंचायतीत सभाआष्टी : आष्टी तालुका निर्मितीची मागणी फार जुनी आहे. तसा प्रस्ताव शासन दरबारी आहे. त्यामुळे जेव्हा नवीन तालुक्यांची निर्मिती होईल. त्यावेळेस आष्टी गावाचा समावेश नवीन तालुक्यांमध्ये निश्चितच होईल. आष्टी तालुका निर्मितीसाठी आपण कटिबद्ध आहोत, असे आश्वासन आ. डॉ. देवराव होळी यांनी शनिवारी ग्राम पंचायत सभागृहात आयोजित कार्यकर्ते व नागरिकांच्या सभेत दिले. सभेला माजी जि. प. अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुराव कोहळे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गेडाम, जि. प. सदस्य धर्मप्रकाश कुकुडकर, जि. प. सदस्य यशवंत धुडसे, माजी जि. प. सदस्य दिवाकर कुंदोजवार, ग्रा. पं. सदस्य रवी नागूलवार, आनंद कांबळे, चामोर्शीचे नगरसेवक प्रशांत एगलोपवार, विठ्ठल आवारी, प्रभूदास खोब्रागडे, कुशवाह उपस्थित होते. आष्टी येथे एमआयडीसीसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. एमआयडीसी झाल्यास आष्टीत मोठा उद्योग निर्माण होण्यास मदत होईल, असेही आ. डॉ. देवराव होळी म्हणाले. विदर्भातील गोंदिया, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या पुढाकाराने मंडळ स्थापन होणार असून, सीआरपीएफ भरती चार मंडळातून होणार आहे. त्यामुळे स्थानिकांना नोकरी मिळणार आहे, अशी माहिती बाबुराव कोहळे यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन ग्राम विस्तार अधिकारी बी. डी. चौधरी यांनी केले. नागरिकांकडून समस्यांचा भडीमारआलापल्ली मसाहत हा भाग आष्टीत समाविष्ट करावा, असा प्रश्न दिवाकर कुंदोजवार उपस्थित केला असता, त्यावर समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे नागरिकांचा रोष याच प्रश्नावर होता. अभयारण्य ओलांडून मार्र्कंडा येथे जाणे योग्य आहे काय, आम्हाला आष्टी ग्राम पंचायतीत समाविष्ट करावे, अशी मागणी नागरिकांनी केल्यानंतर याबाबत महसूल विभागाचे अधिकारी व एसडीओ यांच्याशी लवकरच बैठक लावून सदर प्रश्न सोडवू, असे आश्वासन आमदारांनी दिले. ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्यात यावे, शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची दोन वर्षांची शिष्यवृत्ती द्यावी, जिल्ह्यातील आदिवासी व्यतिरिक्त नोकरभरती बंद आहे. त्यामुळे जिल्ह्यात निवड मंडळ स्थापन करून स्थानिकांना प्राधान्य द्यावे, जिल्ह्याचे पुनर्सर्वेक्षण करून आरक्षण निश्चित करावे, अशी मागणी नागरिकांनी केली असता, आमदारांनी सदर प्रश्नांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.