शहरं
Join us  
Trending Stories
1
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
2
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
3
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
4
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
5
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
6
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
7
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
8
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
9
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
10
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
11
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
12
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
13
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
14
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
15
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
16
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
17
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
18
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
19
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
20
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

देसाईगंज नगर पालिकेच्या गैरकारभाराची आयुक्तांकडून दखल

By admin | Updated: July 7, 2015 01:19 IST

देसाईगंज नगर परिषदेत नगरोत्थान (जिल्हास्तरीय) योजनेतील झालेल्या कामाची अनियमितता व गैरव्यवहाराबाबत ...

१२ मुद्यांवर मागितला खुलासा मुख्याधिकाऱ्यास दिले आदेश
देसाईगंज : देसाईगंज नगर परिषदेत नगरोत्थान (जिल्हास्तरीय) योजनेतील झालेल्या कामाची अनियमितता व गैरव्यवहाराबाबत प्रादेशिक संचालक नगर परिषद प्रशासन नागपूर तथा आयुक्त अनुपकुमार यांनी दखल घेतली असून या प्रकरणी सर्व अनियमिततेविषयी सात दिवसांच्या आत खुलासा सादर करावा, अन्यथा मुख्याधिकाऱ्याविरूध्द शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे आदेश मुख्याधिकारी विनोद जाधव यांना पत्राद्वारे दिले आहे. त्यामुळे देसाईगंज नगर पालिकेत प्रचंड खळबळ उडाली आहे.
सत्ताधारी भाजपच्या हाती असलेल्या देसाईगंज नगर पालिकेत १२ विकास कामांमध्ये निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार होऊन नगर पालिकेचे आर्थिक नुकसान झाल्याच्या तक्रारी आयुक्त कार्यालयास प्राप्त झाल्या होत्या. गडचिरोली जिल्हाधिकारीमार्फत चौकशी केली असता, प्रभाग क्रमांक २ लाखांदूर-वडसा टी पार्इंट ते ब्रह्मपुरी रस्त्यावरील कब्रस्थान आमगाव रस्त्यापर्यंत राज्य मार्गावर रस्ता दुभाजकाचे काम, प्रभाग क्रमांक २ लाखांदूर-वडसा टी पार्इंट ते मुरली राईसमीलपर्यंत रस्ता दुभाजकाचे काम कंत्राटदारसोबत झालेल्या करारनाम्यातील अट क्रमांक १ प्रमाणे महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाहरकत प्रमाणपत्राच्या अधिन राहून कंत्राटदारास कामाचे आदेश देण्यात येईल व नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास काम रद्द समजण्यात येईल व ते कंत्राटदारावर बंधनकारक राहिल. या बाबींमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाची मान्यता नसताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाहरकत गृहीत धरून अवैधरित्या निविदा काढण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याविषयी नाहरकत प्रमाणपत्र द्यायला नकार दिल्यावर काम रद्द न करता विद्युत पोल उभारण्याचे सामान नगर पालिकेला दिले व ते स्वीकारून कंत्राटदारास रक्कम अदा करण्यात आली. हा संपूर्ण प्रकार बेकायदेशीर आहे. हा प्रकार आर्थिक अनियमितेत मोडतो. तसेच कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम (विद्युत विभाग) यांनी केलेल्या तपासणी करारनाम्यानुसार निविदेप्रमाणे सामानाचा पुरवठा करणे आवश्यक होते. परंतु नगर पालिकेला प्राप्त झालेल्या स्ट्रीटलाईटबाबत करारनामा भंग झाल्याचे दिसून येते. आदी सर्व प्रकाराबाबत आयुक्तांनी मुख्याधिकाऱ्यास खुलासा मागितला आहे. आता या प्रकरणाकडे तक्रारकर्त्यासह राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे. (वार्ताहर)