पेंढरी व गट्टा येथे धान खरेदी केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:54 IST2021-02-05T08:54:12+5:302021-02-05T08:54:12+5:30

धानाेरा : आमदार डाॅ. देवराव हाेळी यांच्या पाठपुराव्याने अखेर तालुक्यातील पेंढरी व गट्टा येथे आदिवासी विकास महामंडळांतर्गत आधारभूत धान ...

Commencement of paddy procurement center at Pendhari and Gutta | पेंढरी व गट्टा येथे धान खरेदी केंद्र सुरू

पेंढरी व गट्टा येथे धान खरेदी केंद्र सुरू

धानाेरा : आमदार डाॅ. देवराव हाेळी यांच्या पाठपुराव्याने अखेर तालुक्यातील पेंढरी व गट्टा येथे आदिवासी विकास महामंडळांतर्गत आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन मंगळवारी आमदार डाॅ. देवराव हाेळी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी हेमंत बाेरकुटे, भाजपचे युवा कार्यकर्ते पवन येरमे, संताेष मंडल, दयानंद पवार, किसन लेनगुरे, परमेश्वर गावडे, लक्की सावकार, बाबूराव गेडाम यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित हाेते. पेंढरी व गट्टा येथे आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू न केल्याने खासगी व्यापाऱ्यांना कवडीमाेल भावात धान विकावे लागत हाेते. याबाबतची तक्रार आमदार डाॅ. देवराव हाेळी यांच्याकडे करण्यात आली. त्यानंतर आमदार डाॅ. हाेळी यांनी जिल्हाधिकारी व मंत्रालयात पाठपुरावा करून सदर दाेन्ही गावात धान खरेदी केंद्र सुरू करण्यास भाग पाडले. धान विक्रीदरम्यान शेतकऱ्यांना अडचण आल्यास त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

Web Title: Commencement of paddy procurement center at Pendhari and Gutta