आष्टी : वडसा-गडचिरोली-आष्टी-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्ग ३५३ चे काम येथील आलापल्ली मार्गावरील संरक्षक कुटी ते आंबेडकर चौकापर्यंत सुरू करण्यात येत आहे. या कामाचे भूमिपूजन २६ जानेवारीला जि. प.सदस्या रुपाली पंदिलवार यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते संजय पंदिलवार, शंकर मारशेट्टीवार उपस्थित होते. संरक्षक कुटी ते आंबेडकर चौक असे चार किमीचे दोन्ही बाजूंनी दुपदरीकरण करण्यात येणार आहे. तसेच रस्त्याच्या दुतर्फा मुरूम टाकण्यात येणार आहे. या महामार्गाचे काम बऱ्याच दिवसांपासून गडचिरोलीपासून सुरू झाले आहे. मात्र, अजूनपर्यंत या आंबेडकर चौकातील डांबरीकरण झाले नव्हते. त्यामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले आहेत. येथील ग्रामीण रुग्णालयाजवळ पडलेल्या खड्ड्यांमुळे २० जानेवारीला एक महिला दुचाकीवरून पडली. त्यामुळे तिच्या हात व पायाला जखम झाली. भविष्यातील अपघात टाळण्यासाठी या महामार्गाचे काम लवकर करण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी होती. चौकामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या अटी व नियमानुसार रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या नाल्या मंजूर झालेल्या आहेत, असे याप्रसंगी सांगण्यात आले.
संरक्षक कुटी ते आंबेडकर चौकापर्यंत डांबरीकरणाचा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:49 IST
आष्टी : वडसा-गडचिरोली-आष्टी-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्ग ३५३ चे काम येथील आलापल्ली मार्गावरील संरक्षक कुटी ते आंबेडकर चौकापर्यंत सुरू ...
संरक्षक कुटी ते आंबेडकर चौकापर्यंत डांबरीकरणाचा प्रारंभ
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}