शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
4
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
5
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
6
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
7
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
8
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
9
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
11
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
12
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
14
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
15
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
16
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
17
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
18
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
19
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
20
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आरमोरी शहराचा होणार कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:09 IST

आरमाेरी : आरमोरी नगर परिषदेने शहराच्या विकासासाठी रस्ते, बगिचा, पाणी पुरवठा, स्वछतेवर भर देण्यासोबतच रामसागर तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी आठ कोटी ...

आरमाेरी : आरमोरी नगर परिषदेने शहराच्या विकासासाठी रस्ते, बगिचा, पाणी पुरवठा, स्वछतेवर भर देण्यासोबतच रामसागर तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी आठ कोटी रुपयांचा विकास आराखडा वैशिष्ट्यपूर्ण निधीमधून प्रस्तावित केला आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री तथा नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील नगर परिषदांच्या कामांचा स्वतंत्र आढावा घेतला होता. त्यावेळी त्यांनी केलेल्या सूचनेनुसार विविध कामांचा प्रस्ताव सादर केला जात आहे.

नगर परिषदेचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या रामसागर तलावाच्या पाहणीसाठी बुधवारी (दि.३) जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी भेट दिली.

यावेळी उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम, तहसीलदार कल्याणकुमार दहाट, संवर्गविकास अधिकारी चेतन हिवंज, न.प. अध्यक्ष पवन नारनवरे, उपाध्यक्ष हैदरभाई पंजवाणी, मुख्याधिकारी माधुरी सलामे, सभापती भारत बावनथडे, सभापती विलास पारधी, सभापती सागर मने, न.प.चे विरोधी पक्ष नेता सुदाम मोटवानी, नगरसेवक प्रशांत सोमकुवर, न.प. अभियंता अविनाश बंडावार, कंत्राटदार राहुल तितीरमारे आदी उपस्थित होते.

नगर परिषदेच्या प्रस्तावित कामांमध्ये रामसागर तलाव सौंदर्यीकरण, पंचायत समितीजवळ असलेल्या खुल्या भूखंडावर व बर्डी येथे बगिचा तयार करणे, सिमेंट रस्ते अनेक मोठ्या रस्त्यांवर डांबरीकरण करणे, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आदी कामांसाठी ४० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. याकरिता वैशिष्ट्यपूर्ण, जिल्हा निधीमधून पैसे मिळणार असल्याची माहिती न.प.उपाध्यक्ष हैदरभाई पंजवानी यांनी दिली.

जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या आरमोरी न.प.ने शहरात सिमेंट नाली बांधकामासह वेगवेगळी विकास कामे सुरू केली आहेत. नळ योजनेकरिता लागणारा २४ कोटीचा निधी लवकरच प्राप्त होणार असल्याची माहिती आहे. आरमोरीकरांना मूलभूत सुविधा मिळण्याकरिता बगीचे, आरोग्य, रस्ते, शुद्ध पिण्याची पाणी आदी सुविधांवर भर दिला जाणारा असल्याची माहिती न.प.कडून देण्यात आली.

तीन वर्षात होईल आमूलाग्र बदल

दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या नगर परिषदेकडून मूलभूत सुविधांवर आतापर्यंत भर देण्यात आला. येत्या ३ वर्षात शहरातील विकासात्मक बाबींवर भर दिला जाईल. त्यातून शहराचा कायापालट होईल, अशी माहिती न.प.चे उपाध्यक्ष हैदरभाई पंजवानी यांनी लोकमतशी बोलताना दिली. दरम्यान शहरातील विकासात्मक कामांसाठी आलेल्या प्रस्तावांचा सकारात्मक विचार करून निधी मंजूर केला जाईल, असे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी सांगितले.