नागरिकांनी पुढील १५ दिवस जंगलात जाऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:46 AM2021-09-16T04:46:06+5:302021-09-16T04:46:06+5:30

दवंडीद्वारे पोलीस पाटील, ग्रामपंचायत यांच्याद्वारे नागरिकांना माहिती देण्याच्या सूचना केल्या. याबाबत येत्या १५ दिवसात नागरिकांचे काही नुकसान होत असेल ...

Citizens should not go to the forest for next 15 days | नागरिकांनी पुढील १५ दिवस जंगलात जाऊ नये

नागरिकांनी पुढील १५ दिवस जंगलात जाऊ नये

Next

दवंडीद्वारे पोलीस पाटील, ग्रामपंचायत यांच्याद्वारे नागरिकांना माहिती देण्याच्या सूचना केल्या. याबाबत येत्या १५ दिवसात नागरिकांचे काही नुकसान होत असेल तसेच गुरांना चारा उपलब्धतेबाबत अडचण असेल तर याबाबत वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. वनविभागामार्फत पंचनामे करून नुकसानभरपाई दिली जाईल.

प्रत्येक गावागावात वनविभागात नेमलेले पाच सदस्यीय गट कार्यरत आहेत. याला प्राथमिक प्रतिसाद गट (पीआरटी) असे म्हणतात. गावातील कोणत्याही व्यक्तीला वाघ दिसला तर त्यांनी गावातीलच त्या सदस्यांना तात्काळ कळविणे आवश्यक आहे. तसेच सध्या वाघबाधित क्षेत्रात वनविभागाच्यावतीने दीडशेहून अधिक कर्मचारी काम करत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

सभेला अपर पोलीस अधिक्षक मनीष कलवानिया, उपविभागीय अधिकारी आशिष येरेकर, विशाल मेश्राम, उपवनसंरक्षक कुमारस्वामी, धर्मवीर सालविठ्ठल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतिरकर, मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे, आदिती भारव्दाज, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ उपस्थित होते.

बाॅक्स

वाघाच्या शाेधासाठी ५० कॅमेरे

गडचिरोली तालुक्यातील चुरचुरा, दिभना, गोगाव, जेप्रा, पिपरटोला, नवरगाव, देलोडा, अमिर्झा, बोथेडा या गावांमधील व या गावांच्या जवळील सर्व १५ गावांना जंगलामध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. वनविभागाने वाघाच्या शोधासाठी ५० कॅमेरे लावले आहेत. रॅपिड रिस्पॉन्स पथक वाघाला पकडण्यासाठी आले आहे. शूटरची मदत यासाठी घेतली जात आहे. तसेच ड्रोन कॅमेऱ्याचा वापरही हाेत आहे.

Web Title: Citizens should not go to the forest for next 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app