मुरमाडीत नागरिकांनी घेतली धम्मदीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:50 IST2021-02-05T08:50:54+5:302021-02-05T08:50:54+5:30

गडचिरोली : तालुक्यातील मुरमाडी येथे पौष पाैर्णिमेला दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनात मैत्री संघाच्या वतीने धम्मदीक्षा समारंभ उत्साहात ...

Citizens of Murmadi took Dhammadiksha | मुरमाडीत नागरिकांनी घेतली धम्मदीक्षा

मुरमाडीत नागरिकांनी घेतली धम्मदीक्षा

गडचिरोली : तालुक्यातील मुरमाडी येथे पौष पाैर्णिमेला दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनात मैत्री संघाच्या वतीने धम्मदीक्षा समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी अनेकांनी धम्मदीक्षा घेतली.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी दि बुध्दिस्ट सोसायटीचे जिल्हा प्रवक्ता विजय बन्सोड होते. प्रमुख अतिथी म्हणून बुध्दिस्ट सोसायटीचे जिल्हाध्यक्ष इंजि. नरेश मेश्राम, मुख्य सचिव धम्मराव तानादू, मुख्य संघटक हंसराज लांडगे, सल्लागार अशाेक गडकरी, धम्मानंद मेश्राम, त्रिरत्न समता संघाचे अध्यक्ष चंदूराव राऊत, सचिव एम. ए. रामटेके, मैत्री संघाच्या तारका जांभूळकर, कल्पना खोब्रागडे, देवानंद जांभूळकर, दीपक बोलीवार, संगीता रामटेके, यशोधरा नंदेश्वर, ॲड. सोनाली मेश्राम, सिध्दार्थ साखरे, विभा कुमरे, राजेंद्र कोडापे, देवनाथ मशाखेत्री, खुशाल ढवळे, नरेश भैसारे, लालाजी नगराळे, कुलपती मेश्राम, मनाेहर मेश्राम उपस्थित हाेते. समता सैनिक दलाच्या वतीने जयभीम सलामी दिल्यानंतर भन्ते यांनी उपस्थितांना धम्मदीक्षा दिली.

पौष पाैर्णिमाेच्या दिवशी तथागतांनी मगध साम्राज्याची राजधानी राजगृहाला भेट दिली व याच दिवशी राजा बिंबिसाराने कुटुंबासह तथागताकडून धम्मदीक्षा घेतली. या दोन महत्त्वपूर्ण घटनांमुळे बौध्द धम्मात पौष पाैर्णिमेला महत्त्व प्राप्त झाले, असे प्रतिपादन विजय बन्सोड यांनी केले. दरम्यान बुध्द धम्मदीक्षा प्रमाणपत्राची आवश्यकता याबाबतही मार्गदर्शन केले.

दीक्षा प्रमाणपत्राचे वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. संचालन कल्पना लाडे, प्रास्ताविक तारका जांभूळकर तर आभार राज बन्सोड यांनी मानले. यशस्वीतेसाठी गौतम लांडगे, तुषार भडके, धनंजय मेश्राम, संतोष ऊके तसेच बौध्द समाज मुरमाडीसह मैत्री संघाच्या सदस्यांनी सहकार्य केले.

Web Title: Citizens of Murmadi took Dhammadiksha