शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

नागरिक बसपासून वंचित

By admin | Updated: May 13, 2017 02:09 IST

तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामगड परिसरात बससेवेचा अभाव आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष : धानोरा- बेतकाठी मार्गे मालेवाडा- रामगड बससेवा सुरू करा लोकमत न्यूज नेटवर्क कुरखेडा : तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामगड परिसरात बससेवेचा अभाव आहे. त्यामुळे या भागातील नागरिक खासगी वाहनाने प्रवास करून गाव गाठतात. या भागात राज्य परिवहन महामंडळाने धानोरा ते बेतकाठी व्हाया मालेवाडा- रामगड या मार्गे बससेवा सुरू करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. कुरखेडा तालुक्यातील रामगड परिसर दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जातो. या भागातून अनेक नागरिक नेहमीच तालुका व जिल्हा मुख्यालयात ये- जा करीत असतात. शिवाय धानोरा- बेतकाठी व्हाया मालेवाडा- रामगड हा मार्ग छत्तीसगड सीमेलगत गावांशी संबंधित आहे. कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा ते रामगड दरम्यान अनेक महत्त्वाची खेडी आहेत. परंतु या खेड्यांमध्ये अद्यापही बससेवा पोहोचली नाही. या मार्गाचे डांबरीकरण झाले असतानाही येथे बससेवा सुरू करण्यात आली नाही. गडचिरोली ते बेतकाठी या मार्गावर धानोरा, येरकड, सुरसुंडी, मुरमाडी, देवसरा, जयसिंग टोला, मालेवाडा, धनेगाव, रानवाही, भगवानपूर, पिपरी, वारवी, दादापूर, रामगड, पुराडा, बेळगाव, कोरची, बुटेकसा, बेतकाठी आदी गावांचा समावेश आहे. या मार्गावर बससेवा सुरू झाल्यास नागरिकांकरिता सोयीचे होऊ शकते. तसेच जिल्हा मुख्यालयात व छत्तीसगड येथे जाण्याकरिता कमी अंतर होईल. स्वातंत्र्याची ७० वर्षे उलटूनही या मार्गावर बससेवा सुरू झाली नाही. प्रशासन व एसटी महामंडळाने लक्ष देऊन या मार्गाचे सर्वेक्षण करून बससेवा सुरू करावी, अशी मागणी होत आहे. सर्वेक्षण करून सेवा उपलब्ध करा -तुलावी कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा ते रामगड दरम्यान अनेक महत्त्वाची खेडी आहेत. मात्र या गावांसाठी अद्यापही बस सुविधा प्रशासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आली नाही. या मार्गाचे डांबरीकरण झाले असतानाही याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या मार्गाचे तत्काळ सर्वेक्षण करून बससेवा सुरू करावी, अशी मागणी जि. प. सदस्य प्रभाकर तुलावी यांनी केली आहे. या परिसरातील बहुसंख्य नागरिक सदर मार्गाने ये- जा करतात. त्यामुळे प्रशासनाने दखल घेऊन बससेवा सुरू करावी, अशी मागणी जि. प. सदस्य प्रभाकर तुलावी यांनी केली आहे.