शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्याही दिवशी एटापल्लीत नागरिकांचा कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 00:20 IST

विविध मागण्यांसाठी एटापल्ली तालुका अन्यायविरोधी संघर्ष समितीच्यावतीने १६ आॅगस्टपासून एटापल्ली शहर बंद ठेवले आहे. दुसºयाही दिवशी १७ आॅगस्ट रोजी एटापल्ली शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. विशेष म्हणजे या आंदोलनात शालेय विद्यार्थी, दुकानदार, सामान्य नागरिकांनी संयस्फूर्तीने सहभाग घेतला.

ठळक मुद्देसमस्या सोडवा । मागण्या पूर्ण न झाल्यास चक्काजाम आंदोलनाचा दिला इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : विविध मागण्यांसाठी एटापल्ली तालुका अन्यायविरोधी संघर्ष समितीच्यावतीने १६ आॅगस्टपासून एटापल्ली शहर बंद ठेवले आहे. दुसºयाही दिवशी १७ आॅगस्ट रोजी एटापल्ली शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. विशेष म्हणजे या आंदोलनात शालेय विद्यार्थी, दुकानदार, सामान्य नागरिकांनी संयस्फूर्तीने सहभाग घेतला.एटापल्ली तालुक्याचा विस्तार फार मोठा आहे. त्यामुळे जारावंडी तालुक्याची निर्मिती करावी. तसेच अहेरी जिल्हा निर्माण करावा. स्वतंत्र विदर्भाच्या निर्मितीचा प्रस्ताव शासनाने केंद्र शासनाकडे सादर करावा. वीज बिल निम्मे करावे. बीएसएनएल सेवेचा दर्जा सुधारावा, एटापल्लीतील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये विज्ञान महाविद्यालय सुरू करावे. एटापल्ली येथील बंद केलेले मॉडेल स्कूल पुन्हा सुरू करावे. आदी मागण्यांचे निवेदन शासनाला सादर केले होते. मागण्या मान्य न झाल्यास १६ आॅगस्टपासून एटापल्ली बंद ठेवण्याचा इशारा दिला होता.शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने ठरलेल्या नियोजनानुसार एटापल्लीतील नागरिकांनी १६ आॅगस्टपासून एटापल्ली बंदचे आंदोलन सुरू केले. १६ आॅगस्ट रोजी शाळा, महाविद्यालये, बाजारपेठ बंद ठेवून बसस्थानक परिसरात ठिय्या आंदोलन केले. शनिवारीही आंदोलन सुरूच होते. शनिवारी मेडीकलसुद्धा बंद ठेवण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे या आंदोलनात नागरिक व विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला आहे.पानठेल्यांपासून तर मोठमोठी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली आहेत. आंदोलन शांतपणे सुरू आहे. आंदोलनाची दखल न घेतल्या चक्काजाम, जेलभरो आंदोलन केले जाईल असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.नायब तहसीलदारांनी आंदोलनाला दिली भेटआंदोलनाची दखल घेत एटापल्लीचे नायब तहसीलदार एस. पी. कडार्लावार यांनी शनिवारी आंदोलन स्थळाला भेट दिली. आंदोलकांसोबत चर्चा केली. आंदोलकांनी केलेल्या मागण्यांमधील बहुतांश मागण्या वरिष्ठ स्तरावरील आहेत. उपविभागीय अधिकारी सुध्दा आंदोलनाला भेट देऊन चर्चा करतील, अशी माहिती कडार्लावार यांनी आंदोलकांना दिली. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासनही हादरले आहे.

टॅग्स :Chakka jamचक्काजाम