शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खतांमुळे शेतजमिनीचा पोत घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:35 IST

चामोर्शी : नवनवे तंत्रज्ञान वापरून शेतकरी शेतीचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. तंत्रज्ञानासोबतच रासायनिक खते-कीटकनाशके आदींचा वापर प्रचंड प्रमाणात ...

चामोर्शी : नवनवे तंत्रज्ञान वापरून शेतकरी शेतीचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. तंत्रज्ञानासोबतच रासायनिक खते-कीटकनाशके आदींचा वापर प्रचंड प्रमाणात वाढल्याने शेतजमिनीचा पोत दिवसेंदिवस घसरत आहे. जमिनी बंजर होऊन त्याचा परिणाम उत्पादनावर होत आहे. त्यामुळे आता पुन्हा शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज निर्माण झाली आहे.

याबाबत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांमध्ये जागृती केली जात आहे. उत्पादनवाढीसाठी शेतकरी रासायनिक खतांचा बेसुमार वापर करीत आहेत त्यामुळे जमिनीतील पोषक तत्त्वे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. काही वर्षांपूर्वी शेतकरी शेती व्यवसायासोबतच गाय, बैल, म्हैस, शेळ्या, मेंढ्या आदी जनावरे पाळत होते . जनावरांची विष्ठा शेणखत म्हणून शेतीसाठी उपयोगी पडत होती. शेणखतातून शेतीला मोठ्या प्रमाणावर पोषकतत्त्व मिळत होते त्यामुळे जमिनीचा पोत टिकून होता . या तत्त्वामुळे शेतीला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचत नव्हती, शिवाय शेतीचा पोत वाढत होता. सोबतच पूर्णपणे निरोगी पिकांपासून शेतकऱ्यांना भाजीपाला व इतरही पिके घेता येत होती. उत्पादन दर्जा चांगला राहत होता .त्यामुळे पौष्टिक अन्न मिळण्यास मदत व्हायची; परंतु आता परिस्थिती बदलली आहे. पूर्वी खरीप आणि रब्बी पिकांवर कोणत्याही रोगाचे आक्रमण झाले तरी शेतकरी स्वतः उपाययोजना करीत होता; परंतु कालांतराने ही पद्धत मोडीत निघाली. आता कोणत्याही गावात हे चित्र दिसत नाही. पीक चांगले राहण्याकरिता रासायनिक खतांचा भरमसाठ वापर केला जात आहे. परिणामी जमिनीतील आवश्यक पाेषण तत्त्वे नष्ट होत आहेत. सध्या पिकांना रासायनिक खते मोठ्या प्रमाणात टाकली जात असल्याने उत्पादनावरही परिणाम होत आहे. जिल्ह्यात धान, सोयाबीन व कापूस आदी पिकांचे उत्पादन घेतले जाते. या पिकांच्या वाढीसाठी रासायनिक खतांचा बेसुमार वापर केला जातो आहे. सिंचनाअभावी चार महिने शेती पडीत असते. जिल्ह्यात खरीप व रब्बी पिके शेतकरी घेतात. उन्हाळ्यात धान पिकासाठी सिंचनाची सोय नसल्याने चार महिने शेती पडीक असते. खरीप हंगामात पावसाच्या पाण्यावर शेती केली जाते त्यानंतर जमिनीच्या ओलाव्यावर रब्बी पिके घेतली जातात. ज्या शेतकऱ्यांकडे विहीर व बोअरवेलची व्यवस्था आहे ते भाजीपाला घेतात. परंतु जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात रब्बी पिके निघाल्यानंतर जवळपास चार महिने जिल्ह्यतील शेती पडीक राहते.

शेतकऱ्यांची कामाच्या शोधात बाहेर जिल्ह्यात धाव

शेतकरी कामाच्या शोधात बाहेर जिल्ह्यांत, बाहेर राज्यांत जात आहे. हरभरा, सोयाबीन, गहू कापणी व मळणी तसेच मिरची तोडण्यासाठी माेठा वर्ग गावाबाहेर गेल्याचे चित्र दिसून येत आहे .

जिल्ह्यात खरीप व रब्बी पिके शेतकरी घेतात. उन्हाळ्यात धान पिकासाठी सिंचनाची सोय नसल्याने चार महिने शेती पडीक असते. खरीप हंगामात पावसाच्या पाण्यावरच शेती केली जाते. त्यानंतर जमिनीच्या ओलाव्यावर रब्बी पिके घेतली जातात. ज्या शेतकऱ्यांकडे विहिरी, बोअरवेलची व्यवस्था आहे ते भाजीपालावर्गीय पिकांची लागवड करतात; परंतु जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात रब्बी पिके निघाल्यानंतर जवळपास चार महिने जिल्ह्यातील शेती पडीत राहते. त्यावेळी शेतकरी कामाच्या शोधात बाहेर जिल्ह्यात व बाहेर राज्यात जात असल्याचे दिसून येते.