शिक्षण विभागातील भ्रष्टाचार प्रकरणांची चाैकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:50 IST2021-02-05T08:50:39+5:302021-02-05T08:50:39+5:30

गडचिराेली : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले हाेते. ...

Check corruption cases in the education department | शिक्षण विभागातील भ्रष्टाचार प्रकरणांची चाैकशी करा

शिक्षण विभागातील भ्रष्टाचार प्रकरणांची चाैकशी करा

गडचिराेली : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले हाेते. यावरून माध्यमिक शिक्षण विभागात भ्रष्टाचार हाेताे, हे उघड झाले आहे. घडलेल्या या व यापूर्वीच्या सर्व भ्रष्टाचाराची चाैकशी करून दाेषींवर कारवाई करावी, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने शालेय शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे, जिल्हा कार्यवाह अजय लाेंढे, संजय दाैरेवार, यादव बानबले, सुरेंद्र मामीडवार, मनाेज निंबार्ते, यशवंत रायपुरे, अनिल गांगरेड्डीवार, किरण धाेडरे आदी उपस्थित हाेते.

निवेदनात म्हटले आहे की, शिक्षण विभागाच्या अखत्यारित असलेल्या वेतन पथक कार्यालयातसुद्धा भ्रष्टाचार दिसून येत आहे. वैयक्तिक मान्यता, वेतनेत्तर अनुदान, वैद्यकीय प्रतिपूर्ती, सेवानिवृत्तीचे प्रकरण, वेतन पथकातील देयके आदी हेतुपुरस्सरपणे प्रलंबित ठेवले जात आहेत.

Web Title: Check corruption cases in the education department