शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रप्रमुख झाले आॅनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2017 01:27 IST

शालेय पोषण आहारासह केंद्रातील विविध उपक्रमांची माहिती शासनाला तत्काळ आॅनलाईन सादर करता यावी,

लॅपटॉप उपलब्ध : शालेय पोषण आहाराच्या माहितीसाठी उपयोग गडचिरोली : शालेय पोषण आहारासह केंद्रातील विविध उपक्रमांची माहिती शासनाला तत्काळ आॅनलाईन सादर करता यावी, यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील सर्वच १०३ केंद्रप्रमुखांसाठी लॅपटॉप उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे केंद्रप्र्रमुख आता हायटेक होण्यास मदत होणार आहे. शासनाच्या मार्फतीने अनेक उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांचा आढावा दर आठवड्याला किंवा दरदिवशी शासनाच्या मार्फतीने घेतला जात आहे. केंद्रांतर्गत येणाऱ्या शाळांमधील उपक्रमांची तसेच शालेय पोषण आहाराची माहिती पाठविण्याची जबाबदारी केंद्रप्र्रमुखांची आहे. यापूर्वी केंद्रप्रमुख ही सर्व माहिती वरिष्ठांना कागदोपत्री सादर करीत होते. त्यामुळे माहिती संकलीत करण्यास उशीर होत होता. ही बाब लक्षात घेऊन शासनाने राज्यभरातील सर्वच केंद्रप्रमुखांना लॅपटॉप उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शासनाने गडचिरोली जिल्ह्यातील सर्वच १०३ केंद्रप्रमुख तसेच तालुकास्तरावरील शालेय पोषण आहार अधीक्षक व जिल्हास्तरीय लेखाधिकारी यांना लॅपटॉप उपलब्ध करून दिले आहे. सदर लॅपटॉप शालेय पोषण आहार विभागाच्या मार्फतीने उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे शालेय पोषण आहाराचा आढावा घेण्याची जबाबदारी केंद्रप्रमुखांवर आली आहे. त्याचबरोबर ज्या शाळेत नेट कनेक्टिव्हीटी उपलब्ध नाही, अशा शाळेतील शिक्षक केंद्रस्तरावर जाऊन लॅपटॉपच्या मदतीने माहिती भरू शकणार आहेत. लॅपटॉपमुळे केंद्र प्रमुखांचे काम गतिमान होण्यास मदत होणार आहे. दोन दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्हा परिषदेला लॅपटॉप उपलब्ध झाले. सदर लॅपटॉप सोमवारी तालुकास्तरावरील गट शिक्षणाधिकारी कार्यालयात पोहोचविण्यात आले आहेत. त्यानंतर लॅपटॉपचे वितरण संबंधित केंद्र प्रमुखांना केले जाणार आहेत. त्यामुळे लवकरच केंद्र प्रमुखांचे काम आॅनलाईन सुरू होण्यास मदत होणार आहे. (नगर प्रतिनिधी) इतरही कामांसाठी उपयोग सदर लॅपटॉप शालेय पोषण आहाराची माहिती शासनस्तरावर पाठविण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे या लॅपटॉपचा मुख्य उपयोग शालेय पोषण आहाराची माहिती भरण्यासाठीच होणार आहे. त्याचबरोबर इतरही कामे या लॅपटॉपवर केंद्र प्रमुख करू शकणार आहेत. शालेय पोषण आहाराचे दर दिवशीचे लाभार्थी, उपलब्ध साठा व लागणारा पोषण आहार याबाबतची माहिती शिक्षक मोबाईलद्वारे एमडीएम सॉफ्टवेअरवर भरत होते. मात्र ज्या शाळांमध्ये नेट कनेक्टिव्हिटी नाही अशा शाळांमधील शिक्षकांना माहिती पाठविण्यात अडचण जात होती. सदर शिक्षक आता केंद्र स्तरावर जाऊन माहिती भरू शकणार आहेत.