शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

मार्र्कं डा यात्रेकरूंवर राहणार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

By admin | Updated: March 6, 2016 00:55 IST

जिल्हा व तालुका प्रशासनाच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त मार्र्कं डानगरीत भरणाऱ्या यात्रेची तयारी पूर्ण झाली असून या यात्रेत भाविकांसाठी अनेक सोयीसुविधा देण्यात येणार आहेत.

यात्रेची तयारी पूर्ण : पोर्टेबल लाईट व्यवस्थेने मार्र्कं डानगरी प्रकाशणारचामोर्शी : जिल्हा व तालुका प्रशासनाच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त मार्र्कं डानगरीत भरणाऱ्या यात्रेची तयारी पूर्ण झाली असून या यात्रेत भाविकांसाठी अनेक सोयीसुविधा देण्यात येणार आहेत. वैनगंगा नदीघाटावर पोर्टेबल लाईटची व्यवस्था राहणार असल्याने यात्राकाळात मार्र्कंडानगरी प्रकाशमान होणार आहे. विशेष म्हणजे यंदा प्रथमच मार्र्कं डानगरीत सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली असल्याने यात्रेकरूंवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची २४ तास करडी नजर राहणार आहे.मार्र्कंडा यात्रेदरम्यान वैनगंगा नदीपात्रात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी बोट, लायबाइ, लाईफ जॉकेट, अग्निशमन यंत्र मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिले जाणार आहेत. १ किमी अंतरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्च लाईट मेगाफोन्सचीही व्यवस्था करण्यात येणार असून सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांसाठी प्रथमच स्नानगृह व नावाड्यांना जॉकेट, लायबाइची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी व चामोर्शीचे तहसीलदार यू. जी. वैद्य यांनी दिली आहे. पोलीस विभागाच्या वतीने ३५० पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच १५० गृहरक्षक सुरक्षाव्यवस्थेसाठी तैनात राहणार असून नियंत्रणाकरिता मार्र्कंडानगरीत नऊ पोलीस चौक्या उभारण्यात येणार आहे. संपूर्ण यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक मुख्य नियंत्रण कक्षाची व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय श्वान पथक, घातपात विरोधी पथक, बीडीडीएस पथक, डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर तपासणी कामासाठी राहणार आहे. अपघात टाळण्यासाठी यात्राकाळात मार्र्कं डानगरीत वाहने फिरवू नयेत, असे आवाहन अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बाबर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली चामोर्शीचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी केले आहे. मार्र्कंडा यात्रेदरम्यान भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, याची खबरदारी प्रशासनाच्या वतीने घेण्यात येत असून सदर यात्रा यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी रणजीतकुमार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर विभागाचे अधिकारी प्रयत्न करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)