शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

अपंग नातवाचा भार आंधळ्या आजोबावर

By admin | Updated: November 2, 2016 01:16 IST

आधिच मरकट, त्यात विंचू चावला, वरून विषबाधा झाली, असा दारिद्र्याचा चढता क्रम विधवा वंदना वसंत लांजीकरच्या संसाराचा आहे.

लांजीकर कुटुंबाची कहानी : मोलमजुरी करून जगवावे लागते कुटुंबवैरागड : आधिच मरकट, त्यात विंचू चावला, वरून विषबाधा झाली, असा दारिद्र्याचा चढता क्रम विधवा वंदना वसंत लांजीकरच्या संसाराचा आहे. अपंग नातवाला सांभाळण्याचा भार अंध व बहिरा असलेल्या वयोवृद्ध आजोबाला सांभाळावा लागत आहे. वैरागड येथील वंदना वसंत लांजीकर या विधवा महिलेच्या गरीब कुटुंबाची कहानी कोणत्याही संवेदनशील माणसाच्या हृदयाला पाझर फोडणारी आहे. वंदना वसंतच्या पोटी जन्माला आलेला राकेश हा दोन्ही पायांनी अपंग आहे. त्याचबरोबर आंधळासुद्धा आहे. राकेश घराबाहेर पडला की, सूर्यकिरणांना शोधावा तसा एकसारखा सूर्याकडे पाहत राहतो. त्याला घास भरविण्यापासून बाकी सेवा आजोबा व आईला करावी लागते. पतीच्या निधनाने वंदनाच्या गरिबीचा अंधार आणखी गडद झाला. राकेशचा वृद्ध आजोबा, वृद्ध आजी, अपंग राकेश व राकेशची लहान बहीण या तिघांचाही सांभाळ वंदनाला करावा लागतो. स्वत:च्या मालकीची जमतेम अर्धा एकर जमीन आहे. घरात कुणीही कमावता माणूस नाही. राकेशचे आजोबा काशिनाथ शरीरात त्राण असेपर्यंत अंधूक असताना काम करीत होते. आता मात्र शरीर साथ देत नाही. त्यामुळे वृद्ध काशिनाथसुद्धा मोलमजुरी करू शकत नाही. शासनाकडून संजय गांधी निराधार योजनेचा लाभ विधवा वंदना लांजीकरला व आंधळ्या काशिनाथ लांजीकरला मिळत असला तरी तुटपुंज्या आर्थिक उत्पन्नावर संसाराचा गाडा हाकलने कठीण होते. शेतीवर मोलमजुरी करून वंदना वृद्ध सासू-सासरे, मुलगा राकेश व लहान मुलीला घास भरवित आहे. (वार्ताहर)