शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

झुरी नाल्यावरील पुलाची दरड कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:00 IST

एटापल्ली-जारांवडी मार्गावर देवदा ते हालेवारादरम्यान असलेल्या झुरी नाल्याच्या जवळची दरड कोसळली आहे. त्यामुळे या ठिकाणावरून वाहन नेणे धोकादायक आहे. एसटीच्या फेऱ्या बंद असल्या तरी खासगी वाहने या पुलावरून नेली जात आहेत. एटापल्ली-जारावंडी हा एटापल्ली तालुक्यातील प्रमुख मार्ग आहे. हा मार्ग ५० पेक्षा अधिक लहान मोठ्या गावांना जोडतो.

ठळक मुद्देधोकादायक प्रवास : वाहन नाल्यात कोसळण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : एटापल्ली-जारांवडी मार्गावर देवदा ते हालेवारादरम्यान असलेल्या झुरी नाल्याच्या जवळची दरड कोसळली आहे. त्यामुळे या ठिकाणावरून वाहन नेणे धोकादायक आहे. एसटीच्या फेऱ्या बंद असल्या तरी खासगी वाहने या पुलावरून नेली जात आहेत.एटापल्ली-जारावंडी हा एटापल्ली तालुक्यातील प्रमुख मार्ग आहे. हा मार्ग ५० पेक्षा अधिक लहान मोठ्या गावांना जोडतो. त्यामुळे या मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. याच मार्गावर झुरी नाला आहे. या नाल्यावर शासनाने उंच पूल बांधले आहे. त्यामुळे सदर पूल पावसाळ्यात बुडत नाही. मात्र या पुलाच्या एका बाजुची माती खचत चालली आहे. एकूण रस्त्याच्या पावभाग रस्ता खचला आहे. बांधकाम विभागाने सिमेंटच्या पोत्यांमध्ये माती भरून दरड बुजविण्याचा प्रयत्न केला. मात्र टाकलेली सिमेंटची पोते नाल्याच्या पात्रात कोसळली आहेत. वरची माती निघणे सुरूच आहे. वरून डांबर दिसत असल्याने रस्ता समजून एखाद्या वाहन चालकाने वाहन टाकल्यास ते वाहन सरळ नाल्याच्या पाण्यात कोसळण्याचा धोका आहे.धोकादायक पूल लक्षात घेऊन एसटी महामंडळाने या मार्गाने बसफेरी बंद केली आहे. बसफेरी बंद असल्याने प्रवाशी मिळत असल्याने खासगी प्रवाशी वाहने तसेच कार व इतर वाहने या पुलावरून ये-जा करतात. सदर पूल अतिशय धोकादायक आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून ही समस्या कायम आहे. मात्र बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच या पुलाची डागडुजी करण्यात आली नाही. एखाद्या दिवशी वाहन नाल्याच्या पाण्यात कोसळून मोठा अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

टॅग्स :floodपूर