‘त्या’ बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळला नाल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:54 AM2018-12-29T00:54:43+5:302018-12-29T00:55:18+5:30

तालुक्यातील बेलगाव येथे पाहुणा म्हणून आलेल्या युवकाचा मृतदेह बुधवारी गावाशेजारच्या नाल्यात पुरलेल्या स्थितीत आढळून आला. सुरेश सोनसाय धुर्वे (२५) रा. बोगाटोला पो. कोटरा ता. कोरची असे मृतकाचे नाव आहे.

The body of the missing boy was found in Nalay | ‘त्या’ बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळला नाल्यात

‘त्या’ बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळला नाल्यात

Next
ठळक मुद्देशिकारीसाठी लावलेल्या करंटने मृत्यू : पाच जण पोलिसांच्या ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : तालुक्यातील बेलगाव येथे पाहुणा म्हणून आलेल्या युवकाचा मृतदेह बुधवारी गावाशेजारच्या नाल्यात पुरलेल्या स्थितीत आढळून आला.
सुरेश सोनसाय धुर्वे (२५) रा. बोगाटोला पो. कोटरा ता. कोरची असे मृतकाचे नाव आहे. तो बेलगाव येथील नातेवाईक मनोज कोल्हे यांच्या घरी २२ डिसेंबर रोजी पाहुणा म्हणून आला होता. रात्री जेवन आटोपल्यानंतर फिरून येतो म्हणून घरून निघाला. मात्र रात्री उशीरापर्यंत परत आलाच नाही. त्याची शोधाशोध केली असता, तो दिसला नाही. मंगळवारी तो बेपत्ता असल्याची तक्रार कुरखेडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली. बुधवारी गावात पोलो पाळत सर्व गावकऱ्यांनी गावाशेजारी जंगलात शोधमोहीम राबविली.
यावेळी वाघेडा हद्दितील जंगलात एका ठिकाणावरून काही तरी वस्तू फरफटत नेल्याचे दिसून आले. फरफटत नेल्याच्या खुणा नाल्यापर्यंत गेल्या. नाल्यात काही तरी पुरले असावे, असा संशय नागरिकांना आला.
पोलिसांनी घटनास्थळ गाठून खोदकाम केले. यावेळी दोन फूट खोलात सुरेशचा मृतदेह आढळून आला. त्याच्या अंगावर करंटने भाजल्याच्या खुणा होत्या. जंगलात प्राण्यांच्या शिकारीसाठी लावलेल्या तारांना स्पर्श होऊन सुरेशचा मृत्यू झाला असावा. शिकाºयांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याला नाल्यात पुरले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पाच इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Web Title: The body of the missing boy was found in Nalay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.