शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

भामरागडसाठी बोटीची मागणी

By admin | Updated: September 21, 2015 01:23 IST

भामरागड येथे त्रिवेणी संगम आहे. पावसाळ्यात पुराचे पाणी गावात शिरते व भामरागड मुख्यालयाच्या चारही बाजूने पाणी वेढते.

भामरागड : भामरागड येथे त्रिवेणी संगम आहे. पावसाळ्यात पुराचे पाणी गावात शिरते व भामरागड मुख्यालयाच्या चारही बाजूने पाणी वेढते. त्यामुळे भामरागडचा जगाशी संपर्क तुटून गावाची सीमा ओलांडणे शक्य होत नाही. त्यामुळे महत्त्वाच्या कामावर पाणी फेरावे लागते. याचा अनुभव शहरातील जनतेसह अनेकवेळा अधिकाऱ्यांना आला आहे. त्यामुळे आकस्मिक परिस्थितीत नदी पार करण्यासाठी बोट उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.भामरागड-आलापल्ली मार्गावर पर्लकोटा नदी आहे. या नदीचा पूल अत्यंत ठेंगणा आहे. त्यामुळे पाऊस होताच पुलावरून पाणी वाहण्यास सुरूवात होते. पावसाळ्याच्या दिवसात कित्येक दिवस पुलावरून पाणी राहत असल्याने तालुक्याचा जगाशी संपर्क तुटतो. त्यामुळे या ठिकाणी बोट उपलब्ध करून दिल्यास नदी पार करण्यास सुलभ होईल. आपत्ती व्यवस्थापनावर कोट्यवधी रूपये खर्च केले जातात. मात्र भामरागड तालुक्याला बोट उपलब्ध करून दिली जात नसल्याने नागरिकांनी प्रशासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (तालुका प्रतिनिधी)