‘त्या’ भाजप खासदाराला नोबेल पुरस्कार द्या!

By Admin | Updated: April 26, 2017 01:14 IST2017-04-26T01:14:13+5:302017-04-26T01:14:13+5:30

कर्जमाफीने शेतकरी आळशी होतो, असे विधान करणारे गडचिरोलीचे भाजप खा. अशोक नेते यांचा ...

'That' BJP should give Nobel prize to MP | ‘त्या’ भाजप खासदाराला नोबेल पुरस्कार द्या!

‘त्या’ भाजप खासदाराला नोबेल पुरस्कार द्या!

राधाकृष्ण विखे पाटील यांची खोचक मागणी
गडचिरोली : कर्जमाफीने शेतकरी आळशी होतो, असे विधान करणारे गडचिरोलीचे भाजप खा. अशोक नेते यांचा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदविला आहे. भाजपच्या खासदारांनी केलेल्या या विधानातून शेतकऱ्यांप्रती त्यांच्या सरकारची भूमिका स्पष्ट होते. कर्जमाफीमुळे शेतकरी आळशी होतो, हा नवीन जावई शोध लावल्याबद्दल खा. अशोक नेते यांना संशोधनातील नोबेल पुरस्कार दिला जावा, अशी खोचक मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
विरोधी पक्षातर्फे संयुक्तरित्या काढण्यात आलेल्या संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात त्यांनी कोल्हापूर येथे सदर मागणी केल्याची माहिती त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाने पाठविलेल्या पत्रकातून दिली आहे. तसेच महाराष्ट्रदिनी राज्यभरात कर्जमाफीसाठी ग्रामसभेने ठराव घ्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Web Title: 'That' BJP should give Nobel prize to MP