तीन वर्षांत जिल्ह्यात रोजगाराच्या मोठ्या संधी

By Admin | Updated: June 5, 2015 01:29 IST2015-06-05T01:29:04+5:302015-06-05T01:29:04+5:30

आगामी तीन वर्षांच्या काळात गडचिरोली जिल्ह्यात युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल,

A big opportunity for employment in the district in three years | तीन वर्षांत जिल्ह्यात रोजगाराच्या मोठ्या संधी

तीन वर्षांत जिल्ह्यात रोजगाराच्या मोठ्या संधी

अम्ब्रीशराव आत्राम : आसरअल्ली येथे बँक शाखेचे भूमिपूजन
सिरोंचा : आगामी तीन वर्षांच्या काळात गडचिरोली जिल्ह्यात युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल, यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली येथे गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इमारत भूमीपूजन कार्यक्रमात ते बुधवारी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार होते.
यावेळी कार्यक्रमाला आसरअल्लीच्या सरपंच तैनेनी सरिता रमेश, गुमलगोंडा ग्रा. पं. चे उपसरपंच मोडेम सत्यम मलय्या, गोल्लागुडम ग्रा. पं. सरपंच चंद्रय्या बापू नैताम, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गेडाम, माजी जि. प. अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, संदीप राचर्लावार, दामोधर अरिगेला, शिवशंकर अरिगेला, जय विश्वनाथन, श्रीनिवास गडीवार, लच्चानी शंकर, डॉ. श्रीनिवास, श्रीनिवास गोतुरी आदी उपस्थित होते. यावेळी अरविंद पोरेड्डीवार यांनी जिल्हा मध्यवर्ती बँक सामान्य माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे, असे सांगितले. यावेळी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी विठ्ठलराव पेठा, रेगुंठा येथे महिनाभरात बँकेची शाखा सुरू करण्याबाबत सूचना केली व सिरोंचा बँकेच्या नवीन शाखा इमारतीचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येईल, असे पोरेड्डीवार यांनी यावेळी जाहीर केले. पंतप्रधानाच्या विमा योजनेत आठ हजार खातेदारांना सामावून घेतले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश आयलवार तर संचालन व आभार व्यवस्थापक अरूण निंबेकार यांनी केले.
या कार्यक्रमाला बँकेचे अधिकारी टी. डब्ल्यू. भुरसे, दामोधर कोमिरे, भंडारी, गलबले आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
पालकमंत्री व उपाध्यक्षांचा सत्कार
गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम व जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक श्रीहरी भंडारीवार यांचा बँकेचे उपाध्यक्ष झाल्याबद्दल अरविंद पोरेड्डीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title: A big opportunity for employment in the district in three years