आष्टीत अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:32 IST2021-02-08T04:32:32+5:302021-02-08T04:32:32+5:30

आष्टी : येथील वाॅर्ड क्रमांक ४ मध्ये झाडे यांच्या घराच्या बाजूने २५० मीटर रस्त्याचे भूमिपूजन जि. प. सदस्य रूपाली ...

Bhumipujan of internal road in Ashti | आष्टीत अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन

आष्टीत अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन

आष्टी : येथील वाॅर्ड क्रमांक ४ मध्ये झाडे यांच्या घराच्या बाजूने २५० मीटर रस्त्याचे भूमिपूजन जि. प. सदस्य रूपाली पंदिलवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रभूदास खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्ते संजय पंदिलवार, ग्रा. पं. सदस्य आशिष बावणे, सत्यवान भडके, प्रदीप भुरे, शशी दुर्गे उपस्थित होते. या वसाहतीतील नागरिकांना ये-जा करण्यासाठी पक्का रस्ता नव्हता. जि. प. सदस्य रूपाली पंदिलवार यांनी यासाठी पाठपुरावा केला. सामाजिक कार्यकर्ते संजय पंदिलवार यांनी स्वखर्चाने २५० मीटर रस्त्यावर जेसीबी लावून माती आणि मुरुम रस्त्यावर टाकून त्यावर रोलरने दबाई केली. रस्ता तयार हाेत असल्याने या वसाहतीतील नागरिकांनी जि.प.सदस्य रूपाली पंदिलवार व संजय पंदिलवार यांचे आभार मानले आहेत.

Web Title: Bhumipujan of internal road in Ashti