शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
3
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
4
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
5
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
6
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
7
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
8
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
9
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
10
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
11
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
12
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
13
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
14
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
15
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
16
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
18
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
19
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
20
राखीव प्रवर्गांबाबतच्या ‘त्या’ निर्णयाला स्थगिती, मंत्रिमंडळाचा निर्णय : महाधिवक्त्यांचे मत घेणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भय्याजी वाढई विजयी

By admin | Updated: April 28, 2015 02:16 IST

येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ओबीसी प्रवर्गातील एका जागेसाठी रविवारी पार पडलेल्या निवडणुकीत

पोरेड्डीवार गटाचा एकतर्फी विजय : इंदिरा गांधी चौकात फटाके फोडून पोरेड्डीवार समर्थकांनी केला जल्लोष
गडचिरोली :
येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ओबीसी प्रवर्गातील एका जागेसाठी रविवारी पार पडलेल्या निवडणुकीत अरविंद पोरेड्डीवार गटाचे उमेदवार भैयाजी मारोती वाढई २४१ मतांनी विजयी झाले. विरोधी गटाचे उमेदवार अरुण मुनघाटे यांना पराभव स्वीकारावा लागला.
दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार महर्षी अरविंद पोरेड्डीवार यांच्या गटाचे २१ पैकी २० संचालक यापूर्वीच अविरोध निवडून आले होते. आता भैयाजी वाढई यांच्या विजयाने पोरेड्डीवारांचे संख्याबळ वाढले असून जिल्हा बँकेवर त्यांचे वर्चस्व कायम राहणार आहे.
यापूर्वी २१ पैकी २० जागांसाठी प्रत्येक गटातून एकच उमेदवार असल्याने त्यांना अविरोध विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले होते. त्यात सर्वच उमेदवार अरविंद पोरेड्डीवार गटाचे आहेत. अविरोध निवडून आलेल्या सदस्यांमध्ये मुरलीधर झंझाळ, डॉ.दुर्वेश भोयर, प्रा.पोपटराव तितिरमारे, खेमनाथ डोंगरवार, अनंत साळवे, अमोल गण्यारपवार, वासुदेव गेडाम, श्रीहरी भंडारीवार, इशांत पोरेड्डीवार, अरविंद पोरेड्डीवार, डॉ.बळवंत लाकडे, खुशाल वाघरे, जागोबा खेळकर, प्रंचित पोरेड्डीवार, प्रकाश पोरेड्डीवार, हिरालाल वालदे व बंडू ऐलावार, महिला गटातून मीराबाई नाकाडे व शशिकला देशमुख यांचा समावेश आहे.
मात्र ‘र’ गटातून ओबीसी प्रवर्गातील उमेदवार निवडण्यासाठी भैयाजी वाढई व अरुण मुनघाटे या दोघांचे अर्ज असल्याने २६ एप्रिलला निवडणूक पार पाडली. सोमवारी सकाळी या निवडणुकीची मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत भैयाजी वाढई २४१ मतांनी विजयी झाले. २५० मतांपैकी भैयाजी वाढई यांना २४५, तर अरुण मुनघाटे यांना केवळ ४ मते पडली. एक मत अवैध ठरले. त्यामुळे आता दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर पोरेड्डीवार गटाची निर्विवाद सत्ता प्रस्थापित झाली आहे. पोरेड्डीवार समर्थकांनी येथील इंदिरा गांधी चौकात फटाके फोडून विजयाचा जल्लोष साजरा केला. (प्रतिनिधी)

प्रमाणपत्राचे वाटप
जिल्हा बँकेच्या एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल १० वाजता घोषीत झाल्यानंतर विजय उमेदवार भैय्याजी वाढई यांना येथील ग्रामसेवक भवनात जिल्हा उपनिबंधक जयेश एस. आहेर यांच्या हस्ते विजयी प्रमाणपत्राचे वितरणही करण्यात आले. यावेळी बँकेचे कक्ष अधिकारी जी. के. नरड उपस्थित होते.
अरविंद पोरेड्डीवार, आ. क्रिष्णा गजबे, प्रकाश पोरेड्डीवार यांचे चौकात स्वागत करण्यात आले.