शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

बँक सेवा व कर्जपुरवठा आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : बँक सेवेपासून आतापर्यंत वंचित राहिलेल्या गरिबांना जोपर्यंत कर्जपुरवठा व इतर बँक सेवांचा लाभ मिळत ...

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन : अमिर्झा येथील जीडीसीसी शाखेत साक्षरता कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : बँक सेवेपासून आतापर्यंत वंचित राहिलेल्या गरिबांना जोपर्यंत कर्जपुरवठा व इतर बँक सेवांचा लाभ मिळत नाही, तोपर्यंत बँक शाखांचा विस्तार व वित्तीय समावेशनाचे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले.गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे अमिर्झा येथील शाखेत शनिवारी वित्तीय साक्षरता कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रामुख्याने नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक राजेंद्र चौधरी, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार, शाखा व्यवस्थापक आर.पी. भोयर आदी उपस्थित होते.उपजीविकेसाठी विविध उत्पन्न देणाºया उपक्रमांसाठी बँकांकडून कर्ज पुरवठ्याचे महत्व विशद करताना जिल्हाधिकाऱ्यांनी विविध शासन पुरस्कृत योजनांच्या लाभार्थ्यांना कर्जपुरवठा करताना राष्ट्रीयकृत व जिल्हा बँकांनी सकारात्मक विचार करावा, असे सांगितले. कर्जपुरवठा करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांकडून जे दुर्लक्ष केले जात आहे, त्यामुळे लोकांमध्ये असमाधान व असंतोष आहे. याच कारणासाठी शासन पुरस्कृत योजनांतर्गत बँकांकडे पुरस्कृत केलेल्या सर्व प्रस्तावांचा मी स्वत: आढावा घेणार आहे. ज्या बँक शाखा हे काम करणार नाहीत त्यांची गंभीर दखल घेतली जाईल, असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.जिल्हा विकास प्रबंधक राजेंद्र चौधरी यांनी गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात नियुक्ती होणे म्हणजे गरीब, वंचित व ज्यांच्यापर्यंत आतापर्यंत आपण पोहोचलो नाही, अशा लोकांची सेवा करण्याची संधी आहे, असे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी जिल्हा बँकेच्या ग्राहकांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. बँकेने केलेल्या कामाचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी कौतुक केले. यावेळी बँकेचे ग्राहक, शासन पुरस्कृत योजनेचे लाभार्थी व महिला उपस्थिती होत्या.मोबाईल व्हॅनचे प्रात्यक्षिकयाप्रसंगी बँक सेवा, विमा, किसान क्रेडिट कार्ड आणि शासन पुरस्कृत योजनांची विस्तृत माहिती देण्यात आली. नाबार्ड पुरस्कृत वित्तीय साक्षरता मोबाईल व्हॅनद्वारे प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. तसेच जीवन सुरक्षा विमा योजना व पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचे अर्ज जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

टॅग्स :bankबँकcollectorजिल्हाधिकारी