शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात रिक्त पदांचा अनुशेष कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:09 IST

गडचिरोली : जिल्ह्यातील अनेक विभागांत रिक्त पदे असल्यामुळे नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत. एकाच कामासाठी १५-१५ दिवस शासकीय कार्यालयात ...

गडचिरोली : जिल्ह्यातील अनेक विभागांत रिक्त पदे असल्यामुळे नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत. एकाच कामासाठी १५-१५ दिवस शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागत असल्याने नागरिकांमध्ये शासनाप्रती तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.

डास निर्मूलनासाठी फवारणीची मागणी

गडचिरोली : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त असून, अनेक आजार पसरत आहेत. म्हणून डास निर्मूलनासाठी फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

चपराळा पर्यटन स्थळ विकासाच्या प्रतीक्षेत

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील श्रीक्षेत्र प्रशांतधाम चपराळा येथे दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते. मात्र याठिकाणी सोयी-सुविधांचा अभाव असल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या स्थळाचा विकास करावा.

देलनवाडीतील रस्त्यांवर अतिक्रमण कायम

आरमोरी : तालुक्यातील देलनवाडी येथील अंतर्गत रस्त्यांवर नागरिक व व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने गावातील रस्ते अरूंद झाले आहेत. मात्र या सर्व प्रकाराकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. गावातील नागरिक सरपण, लाकडे, शेणखताचे ढिगारे, बांधकाम साहित्य तसेच व्यावसायिक विविध वस्तू ठेवत आहेत.

कॉम्प्लेक्स मार्गावरील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष

गडचिरोली : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात अनेक शासकीय कार्यालयांसाठी इमारतींचे बांधकाम सुरू झाले आहे. त्यामुळे या परिसरात भविष्यात नागरिकांची गर्दी वाढणार आहे. ही बाब लक्षात घेऊन मुख्य रस्त्याच्या बाजूला तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गावर अतिक्रमणाची संख्या वाढली आहे.

प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा अस्ताव्यस्त वाहने

कुरखेडा : कुरखेडा मार्ग तसेच विश्रामगृह परिसरात नेहमीच पार्किंग केलेली वाहने रस्त्याच्या कडेला दिसून येतात, तर दुसऱ्या बाजूला ट्रान्सपोर्ट करणारे मालवाहू ट्रक उभे करून त्यातील माल उतरविण्यापासून सर्व कारभार रस्त्यावरच चालत असतो. येथे वाहतुकीसाठी अत्यंत कमी जागा शिल्लक राहते. या ठिकाणचे अतिक्रमण हटवून मार्ग मोकळा करून देणे गरजेचे आहे.

भामरागड तालुक्यातील गावांना विजेची प्रतीक्षा

भामरागड : राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्यातील अनेक गावांत विजेचे खांब उभे करण्यात आले. त्यावर ताराही ओढण्यात आल्या. मात्र यावर वीज पुरवठा सुरू करण्यात आला नाही. सातत्याने मागणी करूनही महावितरणच्या अधिकाऱ्यांचे दुर्गम गावांमध्ये वीज पुरवठा करण्याकडे दुर्लक्ष होत आहे.

बसमधील घाणीची स्वच्छता करण्याकडे दुर्लक्ष

आरमोरी : राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली आगारातील अनेक बसेसमध्ये घाण पसरली आहे. प्रवाशांना घाणीच्या ठिकाणीच बसावे लागत आहे. अनेक बसमधील आसनेही तुटल्याने प्रवाशांना प्रवासात त्रास होत आहे. मात्र याकडे महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. अनेक बसगाड्यांची दुरवस्था आहे.