शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या विरोधात आयटकची निदर्शने

By admin | Updated: September 3, 2016 01:27 IST

कामगार वर्गाच्या विविध मागण्यांसाठी आयटकच्या नेतृत्वात स्थानिक इंदिरा गांधी चौकात शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास निदर्शने करण्यात आली.

विविध मागण्यांचा समावेश : शेकडो कर्मचाऱ्यांची उपस्थिती; आंदोलन तीव्र करण्याचा इशारागडचिरोली : कामगार वर्गाच्या विविध मागण्यांसाठी आयटकच्या नेतृत्वात स्थानिक इंदिरा गांधी चौकात शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांमध्ये सरकारी व निमसरकारी विभागाचे कामगार, कर्मचारी, आशा, गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कर्मचारी यांच्या संघटनांनी सहभाग घेतला होता. रोजगार निर्मितीसाठी ठोस पावले उचलून बेरोजगार कमी करण्यात यावी, सर्व कामगारांना सार्वभौम सामाजिक सुरक्षा प्रदान करावी, असंघटीत क्षेत्रातील कामगार, अंगणवाडी सेविका, आशा, गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कर्मचारी, हातपंप देखभाल व दुरूस्ती कर्मचारी यांना किमान १८ हजार रूपये मासिक वेतन देण्यात यावे, ग्रॅज्युएटीची मात्र वाढविण्यात यावी, रेल्वे, सुरक्षा व अन्य महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये विदेशी गुंवणूक केली जाऊ नये आदी मागण्यांसाठी आयटकच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाभरातील हजारो कर्मचारी सहभागी झाले होते. आंदोलनाचे नेतृत्व आयटकचे जिल्हाध्यक्ष देवराव चवळे, जिल्हा सचिव विनोद झोडगे, कामगार नेते महेश कोपुलवार, खेत मजूर युनियनचे जिल्हाध्यक्ष अमोल मारकवार, प्रकाश खोब्रागडे, जगदिश मेश्राम, आशा व गट प्रवर्तक कर्मचारी युनियनच्या जिल्हा सचिव रजनी गेडाम, शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेचे जिल्हा सचिव कुंदा चलिलवार, राधा ठाकरे, जलिलखॉ पठाण आदींनी केले. (शहर प्रतिनिधी)गडचिरोली व मुलचेरातील परिचारिका संपावरपाच दिवसांचा आठवडा लागू करावा, सातवा वेतन आयोग १ जानेवारी पासून लागू करावा, केंद्राप्रमाणेच वाहतूक भत्ता, शैक्षणिक भत्ता, होस्टेल भत्ता राज्य कर्मचाऱ्यांना लागू करावा, महिला कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची बाल संगोपण रजा मंजूर करावी, चतुर्थ व तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांची पदोन्नती नियमानुसार करावी आदी मागण्यांसाठी गडचिरोली व मुलचेरा रूग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा संप केला. काही वेळ रूग्णालयासमोर निदर्शने केली. आंदोलनाचे नेतृत्व अध्यक्ष विस्तारी फेबुलवार, सचिव स्नेहल संतोषवार, विना शर्मा, सपना आर्इंचवार यांनी केले. मुलचेरा येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी जी. बी. गेडाम, एस. पी. मडावी, के. टी. सोनुले, एस. ए. सडमेक, एन. व्ही. रॉय, एस. पी. चौधरी, एल. एम. नगराळे, ए. पी. चिरकुलवार, एल. के. बिरहा, आर. डी. चावरे, डी. ए. तुशावार, एस. एल. रामटेके, पी. जनगम, एस. एस. मालाकार, एस. गायकवाड आदी उपस्थित होते.