शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

जनसंघर्ष यात्रेतून वेधले ज्वलंत प्रश्नांकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:53 IST

गडचिराेली : केंद्र सरकारचे शेतकरीविरोधी कायदे रद्द करणे, ओबीसी जनगणना, शेतकरी कोर्ट, बेरोजगारी, मुस्लिम आरक्षण, आदिवासी जमीन, वनहक्क ...

गडचिराेली : केंद्र सरकारचे शेतकरीविरोधी कायदे रद्द करणे, ओबीसी जनगणना, शेतकरी कोर्ट, बेरोजगारी, मुस्लिम आरक्षण, आदिवासी जमीन, वनहक्क व पेसा कायदा, कर्मचारी पदोन्नती आरक्षण, वसतिगृह निर्मिती अशा विविध ज्वलंत व मूलभूत समस्यांना घेऊन बीआरएसपीतर्फे जनसंघर्ष यात्रा राज्यभर काढण्यात आली. गडचिराेली जिल्ह्यात बाईक रॅलीतून विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले.

प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारीला कार व बाईक रॅली कोरचीपासून सुरुवात झाली. कोरची येथे बाजार चाैकात सभा घेऊन कुरखेडा येथे रथसभा घेण्यात आली. त्यानंतर देसाईगंज येथे दुपारी तीन वाजता पक्षाध्यक्ष ॲड. डाॅ. सुरेश माने यांची सभा फवारा चाैकात पार पडली. रॅलीचे नेतृत्व आरमोरी विधानसभा क्षेत्रप्रमुख सचिन गेडाम व युवा आघाडी प्रमुख सचिन वैद्य यांनी केले. गडचिरोली येथे सायंकाळी सहा वाजता संघर्ष यात्रा पोहाेचली. इंदिरा गांधी चाैकात सभा घेऊन यात्रेचा समारेाप करण्यात आला. या सभेला पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. डाॅ. सुरेश माने मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. सभेला ज्येष्ठ नेते रोहिदास राऊत, भाकपचे डाॅ. महेश काेपूलवार, बीआरएसपी विदर्भ अध्यक्ष विशेष फुटाणे, महासचिव संजय मगर, रमेश पाटील, महिला संयोजिका पूनम घोनमोडे उपस्थित होते. २७ जानेवारीला चामोर्शी व आष्टी येथे सभा घेऊन समारोप करून ही रॅली चंद्रपूर जिल्ह्याकडे रवाना झाली. रॅलीचे नियाेजन बीआरएसपीचे प्रदेश सचिव डाॅ. कैलास नगराळे, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यशस्वीतेसाठी जिल्हा प्रभारी सदाशिव निमगडे, जिल्हा महासचिव पुरुषोत्तम रामटेके, कोषाध्यक्ष मिलिंद बांबोळे, गडचिरोली तालुकाध्यक्ष दीपक बोलीवार, महेश टिपले, प्रीतेश अंबादे, प्रतीक डांगे, धनंजय साहारे, सचिन गेडाम, हिरा राऊत, छाया साखरे, सचिन वैद्य, सचिन बन्सोड, जितेंद्र बांबोळे, संघरक्षित बांबोळे, प्रफुल रायपुरे, तुषार भडके, सतीश दुर्गमवार यांनी सहकार्य केले.