शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
3
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
4
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
5
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
6
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
7
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
8
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
9
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
10
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
11
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
12
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
13
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
14
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
15
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
16
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
17
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
18
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
19
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
20
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
Daily Top 2Weekly Top 5

कमलापुरात ‘अजित’च्या धुमाकुळाने वातावरण भयभीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 05:01 IST

कमलापूर येथील हत्ती कॅम्पमध्ये १० हत्ती असून त्यांची देखरेख करण्यासाठी चार नियमित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय ८ रोजंदारी कर्मचारीही येथे तैनात आहेत. येथे असलेल्या १२ कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण मिळत नसल्याने हत्तींना हाताळण्यासाठी व सांभाळण्यासाठी त्यांना अडचणीचे ठरले आहे. अजित नावाचा हत्ती नेहमीच चवताळल्यासारखा करत असून त्याला सांभाळणे कठीण होत आहे.

ठळक मुद्देदोन दिवस जंगलात मुक्काम : प्रशिक्षणाविना सांभाळणे कर्मचाऱ्यांसाठी झाले कठीण

श्रीधर दुग्गीरालापाठी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कमलापूर : अहेरी तालुक्याच्या कमलापूर येथील हत्ती कॅम्पमधील ‘अजित’ नावाच्या हत्तीने मागील दोन दिवसांपासून धुमाकूळ घातल्याने येथील कर्मचाऱ्यांना हत्तीला सांभाळणे कठीण झाले आहे. त्यातही अजित नावाच्या हत्तीने जंगलात दोन दिवस मुक्काम ठोकला. कर्मचाऱ्यांनी त्याला हत्ती कॅम्पमध्ये आणण्याचा पूर्ण प्रयत्न केला, मात्र हत्ती ऐकण्यास तयार नसल्याने कर्मचाऱ्यांनी पुन्हा या हत्तीला जंगलात सोडले. अखेर बुधवारी अजित कॅम्पमध्ये परत आला. मात्र त्याला नियंत्रित करणे कर्मचाऱ्यांसाठी कठीण झाले आहे.
कमलापूर येथील हत्ती कॅम्पमध्ये १० हत्ती असून त्यांची देखरेख करण्यासाठी चार नियमित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय ८ रोजंदारी कर्मचारीही येथे तैनात आहेत. येथे असलेल्या १२ कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण मिळत नसल्याने हत्तींना हाताळण्यासाठी व सांभाळण्यासाठी त्यांना अडचणीचे ठरले आहे. अजित नावाचा हत्ती नेहमीच चवताळल्यासारखा करत असून त्याला सांभाळणे कठीण होत आहे.
सदर हत्ती पुन्हा धुमाकूळ घालत असल्याने कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील दोन दिवसांपासून अजितने जंगलातच मुक्काम ठोकला. कर्मचाऱ्यांनी त्याला कॅम्पमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. पण त्याला येथे आणणे शक्य झाले नाही. उलट सदर हत्ती कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावत येऊ लागल्याने त्याला जंगलातच सोडून परत यावे लागले. तिसऱ्या दिवशी अजित स्वत:च कॅम्पमध्ये परत आला. मात्र कर्मचारी त्याच्याजवळ जाऊ शकले नाही. परिणामी त्याला मोकाटच सोडावे लागले. तो धुमाकूळ घालत असून रस्त्यावर रहदारी सुरू असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
यापूर्वी अजितने कर्मचारी पेंटा आत्राम याला ठार केले होते. त्यानंतर रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांवर हल्ला चढविला होता. यामध्ये वाहनधारकांचे मोठे नुकसान झाले होते. तसा प्रकार आता होऊ नये, यासाठी वनविभागाने तातडीची उपाययोजना करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिक व वन्यजीव प्रेमींनी केली आहे.

रिक्त पदांचा प्रश्न कायम
हत्तीवर नियंत्रण कसे ठेवावे याचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी वनविभागाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. केवळ १२ कर्मचाºयांच्या भरवशावर येथील हत्तींची देखभाल सुरू आहे. येथे एका हत्तीच्या मागे एक माहुत आणि एक चारा कटाई करणाऱ्याची आवश्यकता आहे. मात्र रिक्त पदे असल्याने येथील हत्तीला परिपूर्ण सेवा देणे कठीण होत आहे. येथील रिक्त पदे भरून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची मागणी जोर धरत आहे. तशी कार्यवाही न केल्यास २०१३ मध्ये घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती नाकारता येणार नाही. या ठिकाणी अनेक पर्यटक जात होते. मात्र कोरोनामुळे जिल्हाबाहेरील पर्यटक येणे बंद झाले आहेत.

‘अजित’च्या पायाला जखम झाली असून त्याला इतर हत्तींपासून दूर ठेवण्यात येत आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्याच्यावर औषधोपचार सुरू आहे. सोमवारी मी स्वत: अजितला बघितले असून त्यानंतर काय झाले, याची मला माहिती नाही.
- जे.व्ही.घुगे, वनपरिक्षेत्राधिकारी, कमलापूर

टॅग्स :forest departmentवनविभाग