आष्टी ग्रा.पं. निवडणुकीत चुरस वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:31 IST2021-01-17T04:31:59+5:302021-01-17T04:31:59+5:30

आष्टी शहर विकास आघाडी व परिवर्तन विकास आघाडी यांच्या अस्तित्वाची लढाई पणाला लागली आहे. उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला असून ...

Ashti G.P. The turnout increased sharply | आष्टी ग्रा.पं. निवडणुकीत चुरस वाढली

आष्टी ग्रा.पं. निवडणुकीत चुरस वाढली

आष्टी शहर विकास आघाडी व परिवर्तन विकास आघाडी यांच्या अस्तित्वाची लढाई पणाला लागली आहे. उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला असून वाढत्या थंडीत निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापलेले आहे. वाॅर्ड क्र. १ मध्ये सर्वसाधारण प्रवर्गात जाेरदार लढत आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गात दाेन महिलांमध्ये लढत आहे. नामाप्र स्त्री राखीव प्रवर्गात थेट लढत होत आहे. वाॅर्ड क्र.२ मध्ये अनु.जाती प्रवर्गात दोन माजी ग्रा.पं. सदस्यांमध्ये लढत होत आहे. अनु.जाती (स्त्री )प्रवर्गात, सर्वसाधारण (स्त्री) राखीव प्रवर्गातही चांगली लढत हाेणार आहे. वाॅर्ड क्र. ३ मध्ये सर्वसाधारण प्रवर्गातून माजी ग्रा.पं. सदस्य मैदानात आहेत. वाॅर्ड क्रमांक ४ व ५ मध्ये काट्याची लढत होत असून, याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. वाॅर्ड क्र. ५ मध्ये काकू-पुतणीची लढत होत आहे. यामध्ये कोण बाजी मारणार याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.

Web Title: Ashti G.P. The turnout increased sharply