शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
3
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
4
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
5
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
6
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
7
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
8
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
9
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
10
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
11
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
12
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
13
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
14
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
15
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
16
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
17
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
18
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
19
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
20
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
Daily Top 2Weekly Top 5

आरमोरी तालुक्यात २१६ जागांसाठी ४९९ उमेदवारांमध्ये होणार लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:59 IST

आरमोरी : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतच्या २६३ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. प्रत्यक्षात २ ग्रामपंचायती पूर्णपणे अविरोध ...

आरमोरी : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतच्या २६३ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. प्रत्यक्षात २ ग्रामपंचायती पूर्णपणे अविरोध तर १७ ग्रामपंचायतींमधील ४७ उमेदवारांची अविरोध निवड झाली आहे. त्यामुळे आता २७ ग्रामपंचायतच्या २१६ जागांसाठी प्रत्यक्ष मतदान होत असून विविध संवर्गातील ४९९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशिब अजमावत आहेत.

आरमोरी तालुक्यातील ९ सदस्यसंख्या असलेल्या कुरंडीमाल व मोहझरी या दोन ग्रामपंचायती अविरोध झाल्याने २७ ग्रामपंचायतसाठी १५ जानेवारीला मतदान होत आहे. ४ जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ४६ इच्छुकांनी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतल्यानंतर निवडणूक रिंगणात उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे आता प्रत्यक्ष निवडणुकीचे वातावरण गावखेड्यात तापायला सुरवात झाली आहे.

निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावर २९ ग्रामपंचायतच्या २६३ जागांसाठी ६०१ नामनिर्देशनपत्र दाखल झाले. त्यापैकी ९ नामनिर्देशनपत्र छाननीमध्ये अवैध ठरले. तर ५९२ वैध ठरले. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ४६ उमेदवारांनी माघार घेतली. तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या ४७ जागांसाठी प्रत्येकी एकाच उमेदवाराने नामनिर्देशनपत्र दाखल केल्याने व त्या उमेदवाराविरोधात दुसरा उमेदवार उभा नसल्याने ते ४७ ही उमेदवार अविरोध निवडून आले आहेत. विशेष म्हणजे निवडणूक रिंगणात उभे असलेले बहुतांश उमेदवार हे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले आहेत.

तालुक्यातील कुरंडीमाल व मोहझरी या दोन ग्रामपंचायती अविरोध झाल्या, या दोन्ही ग्रामपंचायती या आदिवासी क्षेत्रातील आहेत. तर भाकरोडी येथील प्रभाग क्रमांक १ व ३ तसेच चुरमुरा प्रभाग क्रमांक ३ हे तीन प्रभाग अविरोध झाले आहेत. येथील एकूण ९ पैकी ८ जागा अविरोध झाल्या. त्यामुळे फक्त एका जागेसाठी मतदान होणार आहे. कुरंडीमाल ही ग्रामपंचायत अविरोध होण्यासाठी माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी पुढाकार घेतला.