शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

वनहक्कासाठी आता करता येणार विभागीय आयुक्तांकडे अपील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 07:00 IST

वनहक्कासाठी केलेला दावा जिल्हास्तरीय समितीने नामंजूर केल्यास त्या निर्णयाविरोधात विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे अपील करता येणार आहे.

ठळक मुद्देजिल्हास्तरावर दावा फेटाळलेल्यांना संधी

दिगांबर जवादे ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वनहक्कासाठी केलेला दावा जिल्हास्तरीय समितीने नामंजूर केल्यास त्या निर्णयाविरोधात विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे अपील करता येणार आहे. त्यासाठी विभागीय समित्या स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी अधिनियम २००६ नुसार जंगल भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना वैयक्तिक व सामुहिक वनहक्क दिले जातात. याअंतर्गत गावाच्या सीमेंतर्गत येत असलेल्या जंगलातून तेंदूपत्ता व बांबू यासारखे गौण वनोपज गोळा करणे, तलावात मत्स्योत्पादन करणे, जमीन कसण्याचे अधिकार प्रदान करणे आदी हक्क दिले जातात. त्यामुळे जंगल भागातील नागरिकांच्या दृष्टीने वनहक्काचे विशेष महत्त्व आहे. वनहक्क मिळण्यासाठी ग्रामसभेमार्फत अर्ज केला जाते. तालुका, विभागीय व जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिल्यानंतर वनहक्काचे अधिकार मिळतात. मात्र जिल्हास्तरीय समितीने दावा नामंजूर केल्यानंतर या समितीच्या निर्णयाविरोधात अपील करण्याची आजपर्यंत सोय नव्हती. त्यामुळे अनेकांना वनहक्कांपासून वंचित राहावे लागत होते.

जिल्हास्तरीय समितीने १८ मे २०२० पूर्वी दावा अमान्य केला असल्यास त्याविरोधात सहा महिन्यांच्या आत तर १८ मे नंतर दावा अमान्य केला असल्यास त्यासंबंधीचे आदेश प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून ९० दिवसांच्या आत विभागीय समितीकडे अपील सादर करणे आवश्यक राहणार आहे.

मुख्य वनसंरक्षक, अपर आयुक्तांचा समावेशआदिवासी विकास विभागाने २८ सप्टेंबर रोजी याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे. त्यात विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीत मुख्य वनसंरक्षक, अनुसूचित जमातीचे तीन अशासकीय सदस्य, आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त यांचा समावेश राहणार आहे. जिल्हास्तरीय समितीने १८ मे २०२० पूर्वी दावा अमान्य केला असल्यास त्याविरोधात सहा महिन्यांच्या आत तर १८ मे नंतर दावा अमान्य केला असल्यास त्यासंबंधीचे आदेश प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून ९० दिवसांच्या आत विभागीय समितीकडे अपील सादर करणे आवश्यक आहे.

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजना