शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त जमावाने स्वर्गरथ फोडला

By admin | Updated: January 9, 2016 01:46 IST

स्मशानघाटाकडे प्रेत नेण्यासाठी स्वर्गरथ न आणल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या नागरिकांनी नगर परिषदेमध्ये मृतदेह नेला.

वाहनाचे नुकसान : मृतदेह घेऊन नागरिक पालिकेत दाखलगडचिरोली : स्मशानघाटाकडे प्रेत नेण्यासाठी स्वर्गरथ न आणल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या नागरिकांनी नगर परिषदेमध्ये मृतदेह नेला. त्याचबरोबर स्वर्गरथाची जाळपोळ केली. सदर घटना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. गोकुलनगर येथील बालू भानारकर (३८) या इसमाचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. त्याचा प्रेत कठाणी नदी घाटावर नेण्यासाठी त्याच्या नातेवाईकांनी नगर परिषदेमध्ये ३ वाजता फोन करून स्वर्गरथ ४ वाजता आरमोरी मार्गावरील इसाम्याजवळ ठेवण्यास सांगितले. त्यानुसार स्वर्गरथाचा चालक मुजाहिद वसीम पठाण याने स्वर्गरथ आरमोरी मार्गावरील इसाम्यावर नेऊन ठेवले. मात्र अर्धा ते पाऊण तास उलटूनही अंत्ययात्रा आरमोरी मार्गावरच्या इसाम्याजवळ पोहोचली नाही. त्यामुळे पठाणने स्वर्गरथ चामोर्शी मार्गावरच्या इसाम्याजवळ नेण्यास सुरूवात केली. गोकुलनगरातील नागरिक चामोर्शी मार्गावर इसामा देतात. इसामा देऊन १५ मिनिटापेक्षा अधिक कालावधी उलटूनही स्वर्गरथ न आल्याने मृतकाच्या नातेवाईक व मित्रांनी त्याचा मृतदेह खासगी वाहनामध्ये टाकला. सदर मृतदेह अंत्ययात्रेसह सरळ नगर परिषदेमध्ये आणण्यात आला. अंत्ययात्रेमध्ये ४० ते ५० नागरिक सहभागी होते. तोपर्यंत स्वर्गरथही नगर परिषदेमध्ये परत आला होता. अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी नगर परिषदेच्या विरोधात घोषणा दिल्या. त्याचबरोबर स्वर्गरथाची तोडफोड केली. त्यानंतर अगदी १० मिनिटातच प्रेत उचलला व कठाणी नदी घाटाकडे घेऊन गेले. विशेष म्हणजे, अंत्ययात्रीमध्ये एका नगरसेवकाचाही समावेश होता. याबाबतची तक्रार नगर परिषदेने रात्री ९ वाजता गडचिरोली सादर पोलिसांकडे केली आहे. या घटनेची चौकशी केल्यानंतर तोडफोड करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होणार आहे. (नगर प्रतिनिधी)