शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
2
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
3
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
4
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
5
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
6
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
7
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
8
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
9
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
10
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
11
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
12
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
13
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
14
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
15
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
16
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
17
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
18
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
19
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
20
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी महिलांची चिटफंडकडून फसवणूक

By admin | Updated: June 18, 2016 00:54 IST

अंगणवाडी पर्यवेक्षिकांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून अंगणवाडी महिलांवर दबाव टाकून मैत्र या चिटफंड कंपनीचे सदस्य बनविले.

रमेशचंद्र दहिवडे : पर्यवेक्षिकांवर कारवाई कराचामोर्शी : अंगणवाडी पर्यवेक्षिकांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून अंगणवाडी महिलांवर दबाव टाकून मैत्र या चिटफंड कंपनीचे सदस्य बनविले. आता मैत्र ही कंपनी पसार झाल्यामुळे गोरगरीब अंगणवाडी महिला कार्यकर्त्यांची लाखो रूपयांनी फसवणूक झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून चिटफंड कंपनीचे सदस्य बनविण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या पर्यवेक्षिकांवर कारवाई करावी, अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी केली.अंगणवाडी महिला कार्यकर्त्यांचा मेळावा दुर्गा जाम्पलवार यांच्या अध्यक्षतेखाली चामोर्शी येथे बुधवारी घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अंगणवाडीच्या मासिक अहवाल बैठकांमध्ये दर महिन्याला अंगणवाडी महिलांकडून मैत्रीची नावाखाली नियमित वसुली केल्या जात होती. या सर्व प्रकाराला अंगणवाडी पर्यवेक्षिकाच जबाबदार आहेत. त्यामुळे जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करावी, तसेच संबंधित दोषी पर्यवेक्षिकावर कारवाई करावी, अशी मागणी प्रा. दहिवडे यांनी यावेळी केली. प्रास्ताविक ज्योती बेजंकीवार यांनी तर आभार सुशिला बुरांडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी माया अहीरकर, सुनीता वद्देलवार, छाया आभारे यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)