अहेरीकरांना मिळाली रूग्णवाहिका

By Admin | Updated: July 18, 2015 01:29 IST2015-07-18T01:29:33+5:302015-07-18T01:29:33+5:30

अहेरीचे माजी आमदार श्रीमंत राजे सत्यवानराव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अहेरीकरांना पालकमंत्र्यावतीने नवीन रूग्णवाहिका शुक्रवारी देण्यात आली.

Anabolic Sick | अहेरीकरांना मिळाली रूग्णवाहिका

अहेरीकरांना मिळाली रूग्णवाहिका

अहेरी : अहेरीचे माजी आमदार श्रीमंत राजे सत्यवानराव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अहेरीकरांना पालकमंत्र्यावतीने नवीन रूग्णवाहिका शुक्रवारी देण्यात आली. या रूग्णवाहिकेचे लोकार्पण राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी एक हजारावर नागरिकांची आरोग्य तपासणी तर अतिगरजू विद्यार्थ्यांना नोटबुकाचे वितरणही त्यांनी केले.
नोंदणी परवाने, रक्तदान शिबिर व साहित्याचे झाले वितरण
नाग विदर्भ आंदोलन समिती, श्रीमंत राजे विश्वेश्वराव महाराज स्मारक प्रतिष्ठाण अहेरी व भारतीय जनता पक्ष यांच्या वतीने आयोजित नेत्र तपासणी शिबिरात नागरिकांची नेत्र तपासणी व एक हजार नागरिकांची रक्तदाब, रक्तशर्करा तपासणी झाली. शेकडो युवकांनी रक्तदानही केले. अपंगांची प्रमाणपत्र नोंदणी करण्यात आली. सर्जिकल बँकेचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. दुचाकी व चारचाकी वाहनधारकांसाठी चालक परवाना शिबिराचे आयोजन करण्यात आले. परवाना शिबिरात २०० परवान्यांचे वितरण झाले. अतिगरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. मुस्लिम बांधवांसाठी सायंकाळी इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली. अपंगांना साहित्य व शेतकऱ्यांना कृषीविषयक साहित्याचे वितरण यावेळी करण्यात आले.

Web Title: Anabolic Sick