आलापल्ली-पेरमिली मार्ग दुरवस्थेत

By Admin | Updated: July 19, 2015 01:44 IST2015-07-19T01:44:52+5:302015-07-19T01:44:52+5:30

अहेरी तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या आलापल्ली-पेरमिली मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने या मार्गाची दुर्दशा झाली आहे.

Alpalli-Peramboli road is in a daze | आलापल्ली-पेरमिली मार्ग दुरवस्थेत

आलापल्ली-पेरमिली मार्ग दुरवस्थेत


अहेरी तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या आलापल्ली-पेरमिली मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने या मार्गाची दुर्दशा झाली आहे. सदर मार्गावरून नेहमीच दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळ राहत असल्याने येथे अपघाताची शक्यता बळावली आहे. सदर मार्गाची दुरूस्ती करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे परिसरातील नागरिकांकडून वारंवार करण्यात आली. मात्र नागरिकांच्या मागणीकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले. या मार्गावरील अपघात टाळण्यासाठी मार्गाची दुरूस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Web Title: Alpalli-Peramboli road is in a daze