शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

आघाडी, युती दुभंगल्याने राजकीय समीकरणही बदलणार

By admin | Updated: September 27, 2014 01:41 IST

गुरूवारी महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड भूकंप होऊन शिवसेना, भाजपची २५ वर्षाची युती तुटली.

गडचिरोली : गुरूवारी महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड भूकंप होऊन शिवसेना, भाजपची २५ वर्षाची युती तुटली. तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचीही १५ वर्षानंतर काडीमोड झाली. याचे पडसाद जिल्ह्याच्याही राजकारणात झपाट्याने पडले आहे. राजकीय समीकरणही मोठ्या प्रमाणावर बदलण्याचे चिन्ह दिसू लागली असून मोठ्या राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेक पक्षांना उमेदवार शोधतानाही दमछाक करावी लागत आहे. अनेक ठिकाणी इतर पक्षातून आयात केलेले उमेदवार आपल्या पक्षाचे अधिकृत उमेदवार बनविण्याचा प्रकार गडचिरोली जिल्ह्यातही सुरू होण्याची चिन्ह दिसत आहे. गडचिरोली जिल्ह्यात तीनही विधानसभा मतदार संघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. या मतदार संघामध्ये जिल्हा निर्मितीपासून विधानसभा निवडणुका लढणारे ठराविकच उमेदवार आहेत. तेच आलटून पालटून एक-दुसऱ्या पक्षाकडून रिंगणात उतरत असतात. तर काही राजकीय पक्षांना विशिष्ट घराणेशाहीने ‘हायर’ केले आहे. त्यामुळे या घराण्यातील लोकांना वारंवार पक्षाकडून उमेदवारी दिली जात असल्याने सर्वसामान्य कार्यकर्ते आपण सतरंज्याच उचलत राहायच्या का? या मानसिकतेत आले आहे. यंदा शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे प्रमुख पक्ष स्वबळावर लढणार असल्याने मोठी चुरशीची लढत जिल्ह्यात होणार आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचे जिल्हाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजप व नाविस युतीचे उमेदवार म्हणून अम्ब्रीशराव महाराजांनी रणशिंग फुंकले आहे. काँग्रेस पक्षाकडून येथे मुक्तेश्वर गावडे गुरूजी यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तर अपक्ष म्हणून विद्यमान आमदार दीपक आत्राम पुन्हा मैदानात उभे ठाकतील. शिवसेनेने रामसाय पोचा मडावी यांना अहेरीतून उमेदवारी दिली आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात काँग्रेसने सगुणा पेंटारामा तलांडी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र शनिवारी विद्यमान काँग्रेस आमदार डॉ. नामदेव उसेंडी हेही नामांकन पत्र दाखल करणार आहे. भारतीय जनता पक्षाकडून डॉ. देवराव होळी यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र भाजपच्यावतीने शंभुविधी गेडाम यांचा डमी उमेदवारी अर्जही भरल्या जाणार आहे, अशी माहिती पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. शिवसेनेने वासुदेव शेडमाके यांना गडचिरोलीतून उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मीनाक्षी कोडाप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याशिवाय बसपाकडून कोण उमेदवार राहतो, याकडेही अनेकांचे लक्ष आहे. भारिप व बहुजन महासंघाने पुरूषोत्तम गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे.आरमोरी विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार आनंदराव गेडाम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेकडून डॉ. रामकृष्ण मडावी हे उमेदवार आहे. तर भारतीय जनता पक्षाकडून क्रिष्णा दामाजी गजबे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हरिराम वरखडे व जयदेव मानकर यांच्या नावाची चर्चा आहे. याशिवाय चंदेल गटाकडूनही जयेश चंदेल यांना आरमोरी तर गडचिरोली व अहेरीतही उमेदवार दिले जाण्याची शक्यता आहे. या साऱ्या राजकीय घडामोडीत मतदार राजा योग्य तो निर्णय घेण्याच्या मनस्थितीत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर लढतीचे चित्र अधिक स्पष्ट होईल. (जिल्हा प्रतिनिधी)