शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदी करण्यासाठी महिला आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 06:00 IST

काही दिवसांपूर्वी लक्ष्मीदेवपेठा येथे तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील आणि पोलीस निरीक्षक रामेश्वर दराडे यांच्या उपस्थितीत दारूविक्री बंद करण्यासाठी विशेष सभा घेण्यात आली. येत्या काही दिवसात दारूविक्री न थांबल्यास मोठ्या प्रमाणात अहिंसक कृतीचा निर्णय महिलांनी यावेळी बोलून दाखविला होता. लक्ष्मीदेवपेठा येथे चोरून लपून दारूविक्री होत आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । लक्ष्मीदेवपेठा येथे करणार अहिंसक कृतीद्वारे कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तालुक्यातील लक्ष्मीदेवपेठा येथील ८५ महिलांनी गावातील दारूविक्री पूर्णत: बंद करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. अहिंसक कृतीच्या माध्यमातून महिला अवैैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करणार आहेत.काही दिवसांपूर्वी लक्ष्मीदेवपेठा येथे तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील आणि पोलीस निरीक्षक रामेश्वर दराडे यांच्या उपस्थितीत दारूविक्री बंद करण्यासाठी विशेष सभा घेण्यात आली. येत्या काही दिवसात दारूविक्री न थांबल्यास मोठ्या प्रमाणात अहिंसक कृतीचा निर्णय महिलांनी यावेळी बोलून दाखविला होता. लक्ष्मीदेवपेठा येथे चोरून लपून दारूविक्री होत आहे. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण असते. महिलांना पतीकडून मारहाण होत असते. त्यामुळे येथील दारू विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाई करून विक्री थांबावी यासाठी मुक्तिपथ गाव संघटनेच्या पुढाकाराने विशेष सभा घेण्यात आली. या सभेला तंटामुक्ती अध्यक्ष व्यंकटेश शानागुडा, पोलीस पाटील मलुनेश आदे आणि पोलीस निरीक्षक रामेश्वर दराडे यांच्यासह गाव संघटनेच्या ८५ महिला उपस्थित होत्या. दारूमुळे होत असलेला शारीरिक व मानसिक त्रास महिलांनी यावेळी सांगितला. गावात शांतता नांदण्यासाठी चार दिवसात सर्वच विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाई करून गावातील दारूविक्री कायमची बंद करण्याचे आश्वासन तंटामुक्ती अध्यक्षांनी दिले. महिलांच्या सदैव पाठीशी असून विक्रेत्यांची गय केली जाणार नसल्याने दराडे यावेळी म्हणाले. येत्या चार दिवसात दारूविक्री बंद न झाल्यास आक्रमक भूमिका घेत संपूर्ण गावात एकाच दिवशी अहिंसक कृती करणार असल्याचा निर्धार महिलांनी केला. गाव प्रशासन व महिलांच्या आक्रमक भूमिकेमुळे दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.१५ दारूविक्रेते सक्रियलक्ष्मीदेवपेठा येथे मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर अवैैध दारूविक्री केली जात आहे. गावात १५ दारूविक्रेते सक्रीय आहेत. त्यामुळे परिसराच्या गावातीलही व्यसनी येथे दारू पिण्याकरिता येतात. गावातील अनेक युवक दारूच्या आहारी गेले आहेत. व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढल्याने सर्वाधिक त्रास महिलांना होत आहे. त्यामुळे येथील पंधरा अवैध दारूविक्रेत्यांवर कठोर कारवाईचा इशारा महिलांनी दिला आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी