शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
4
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
5
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
6
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
7
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
9
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
10
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
11
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
12
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
13
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
14
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
15
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
16
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
17
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
18
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
19
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
20
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक अंगावरून जाऊनही वाचली वयस्क महिला

By admin | Updated: April 7, 2017 01:07 IST

ट्रकच्या अगदी मधोमध पडल्याने ट्रक अंगावरून जाऊनही महिला सुखरूप बचावल्याची घटना

इंदिरा गांधी चौकातील घटना : दुचाकीवरून खाली पडल्याने घडला अपघातगडचिरोली : ट्रकच्या अगदी मधोमध पडल्याने ट्रक अंगावरून जाऊनही महिला सुखरूप बचावल्याची घटना स्थानिक इंदिरा गांधी चौकात गुरूवारी सायंकाळी ५.४५ वाजता सुमारास घडली.गीताबाई उईके (६२) रा. येरकड ता. धानोरा असे सुखरूप बचाविलेल्या वृध्द महिलेचे नाव आहे. गीताबाई उईके या आपल्या नातेवाईकांसोबत चामोर्शी येथे गेल्या होत्या. गडचिरोली येथील लांजेडा वार्डात नातेवाईक राहत असल्याने ते गडचिरोली येथे थांबणार होते. चामोर्शीवरून लांजेडा वार्डाकडे जाताना इंदिरा गांधी चौकातील वाहतूक दिवे रेड सिग्नल दाखवित असल्याने ते चौकात सिग्नल सुरू होण्याची वाट पाहत होती. त्याचवेळी सिग्नल बंद असल्याने चामोर्शीवरून आरमोरीकडे जाणारा सी. जी. ०७ सीए ८६१५ क्रमांकाचा ट्रकही थांबला होता. सिग्नल सुरू होताच ट्रक व गीताबाई उईके यांची दुचाकी व ट्रक आपापल्या मार्गाने निघाल्या. दरम्यान चामोर्शी मार्गावरून धानोरा मार्गाकडे वळत असताना गर्दीतील एका दुचाकीस्वाराने कट मारल्याने गीताबाई उईके या दुचाकीवरून खाली कोसळल्या. त्याचवेळी ट्रकही येत असल्याने त्या सरळ ट्रकच्या खाली आल्या. चौकातील नागरिकांनी आरडाओरड करण्यास सुरूवात केल्याने ट्रक खाली कोणीतरी सापडला आहे ही बाब चालकाच्या लक्षात आली. मात्र तोपर्यंत ट्रक समोर निघाला होता व गीताबाई उईके या सुखरूप बाहेर पडल्या. त्यांच्या खांद्याला थोडाफार मार लागला. मात्र इतरत्र कुठेही जखम झाली नाही. वाहतूक पोलिसांनी तत्काळ गीताबाईला उचलून वाहतूक पोलीस चौकीमध्ये नेले. अपघात झाल्याची वार्ता सभोवताल परसरताच सभोवतालचे दुकानदार, ये-जा करणाऱ्या नागरिकांनी गीताबाई उईके यांना पाहण्यासाठी तसेच अपघात नेमका कसा झाला हे विचारण्यासाठी एकच गर्दी केली होती. पोलिसांनी जिप्सी बोलविली. त्यानंतर गीताबाई उईके यांना रूग्णालयात भरती केले. अपघात झाल्यानंतर जवळपास तास भर चौकात गीताबाई उईके यांच्या अपघाताच्या चर्चेचा विषय बनला होता. पोलिसांनी चौकात थांबलेला ट्रक पोलीस स्टेशनमध्ये जमा केला. त्याचबरोबर वाहनचालकालाही ताब्यात घेतले. (नगर प्रतिनिधी)