शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता अभियानासाठी कृती महत्त्वाची

By admin | Updated: January 30, 2016 01:59 IST

संपूर्ण भारतात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी देशातील प्रत्येक नागरिकाने प्रत्यक्ष कृती करणे महत्त्वाचे आहे.

आरमोरीत लोक माहिती अभियान : जनसामान्यांच्या मेळाव्यात चंदू मारकवार यांचे प्रतिपादनआरमोरी : संपूर्ण भारतात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी देशातील प्रत्येक नागरिकाने प्रत्यक्ष कृती करणे महत्त्वाचे आहे. शासन काय करते? असा सवाल करण्यापेक्षा मी स्वत: देशासाठी, माझ्या गावासाठी काय करतो, याचे आत्मपरिक्षण करावे, स्वच्छता अभियानाच्या यशासाठी प्रत्यक्ष कृती महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील राजगड गावचे उपसरपंच चंदूजी मारकवार यांनी शुक्रवारी केले. आरमोरी येथील महात्मा गांधी महाविद्यालयाच्या सभागृहात लोक माहिती अभियानांतर्गत आयोजित व्याख्यान कार्यक्रमात मारकवार बोलत होते. सरपंच, ग्रा. पं. सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल व जनसामान्यांच्या मेळाव्याला कृषी अधिकारी अभिजीत धडे, बँक आॅफ इंडियाचे व्यवस्थापक सुनील पाटील, जि. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) एस. आर. धनकर, जिल्हा ग्रामीण विकास योजनेचे प्रकल्प संचालक डी. के. बारापात्रे, नायब तहसीलदार डी. एस. नैताम, सूचना कार्यालयाचे सहाय्यक संचालक संजय आर्वीकर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सुरेश गांजरे यांनी केले. (प्रतिनिधी)अधिकाऱ्यांनी दिली योजनांची माहितीव्याख्यान सत्रात अभिजीत धेडे यांनी मृदा आरोग्य पत्रिका, कृषी योजना, बी- बियाणे तयार करण्याची पद्धती, मातीचे परिक्षण याबाबत, सुनील पाटील यांनी पंतप्रधान जीवनज्योती योजना, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जनधन योजना आदींची माहिती चित्रफितीच्या माध्यमातून दिली. एस. आर. धनकर यांनी पंचायत क्षेत्र विस्तार कायदा, आदिवासींचे वनहक्क, भूहक्क, पेसा अंतर्गत ग्रामसभेचे महत्त्व, डी. के. बारापात्रे यांनी ग्रामीण जीवनज्योती योजना, इंदिरा आवास योजना, मागासक्षेत्र अनुदान योजना डी. एस. नैताम यांनी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेची माहिती दिली.