शहरं
Join us  
Trending Stories
1
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
2
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
3
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
4
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
5
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
6
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
7
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
8
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
9
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
10
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
11
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
12
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
13
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
14
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
15
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
16
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
17
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
18
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
19
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
20
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारणचे अभियंते व कंत्रादारावर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 06:00 IST

गडचिरोली जिल्ह्यात चंद्रपूर येथील मृद व जलसंधारण विभागामार्फत मोठ्या प्रमाणावर जलयुक्त शिवार योजनेची कामे करण्यात आली. हुडुकदुमा येथे दोन बंधारे मंजूर करण्यात आले. त्यासाठी शासनाने २१ लाख ४५ हजार ६७४ रूपये मंजूर केले होते. मात्र कंत्राटदाराने अतिशय निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले. याकडे जल व मृद संधारण विभागाच्या अभियंत्यांनी दुर्लक्ष केले.

ठळक मुद्देलोकमतने प्रकरण आणले उघडकीस । कोरची तालुक्यात बंधाऱ्यांचे बांधकाम झाले निकृष्ट दर्जाचे

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : कोरची तालुक्यातील बोरी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील हुडुकदुमा येथे चार महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेले दोन सिमेंट बंधारे पहिल्याच पावसात वाहून गेल्याचे लोकमतने वृत्त प्रकाशीत करून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. या बांधकामाच्या चौकशीनंतर जल व मृद संधारण विभागाचे उपविभागीय अभियंता वाय.जी.बरडे, कनिष्ठ अभियंता एम.टी.पेंदाम व कंत्राटदार शताब कुरेशी यांच्यावर भादंवि कलम ४३१, ४०९, ४६८,४७१,४२०,३४ अन्वये बेडगाव पोलीस मदत केंद्रात शनिवारी गुन्हे दाखल केले आहेत.गडचिरोली जिल्ह्यात चंद्रपूर येथील मृद व जलसंधारण विभागामार्फत मोठ्या प्रमाणावर जलयुक्त शिवार योजनेची कामे करण्यात आली. हुडुकदुमा येथे दोन बंधारे मंजूर करण्यात आले. त्यासाठी शासनाने २१ लाख ४५ हजार ६७४ रूपये मंजूर केले होते. मात्र कंत्राटदाराने अतिशय निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले. याकडे जल व मृद संधारण विभागाच्या अभियंत्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे हे बंधारे पहिल्याच पाण्यात वाहून गेले. याबाबत लोकमतने वाहून गेलेल्या दोन्ही बंधाऱ्यांच्या बातम्या प्रकशीत करून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. त्यानंतर उपजिल्हाधिकारी रोहयो यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली. या चौकशी समितीने प्रत्यक्ष बंधाऱ्यावर जाऊन चौकशी केली असता बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे निष्पन्न झाले. जलयुक्त शिवार अभियान समितीचे अध्यक्ष समाधान शेंडगे यांनी कोरचीच्या नायब तहसीलदार रेखा बोके यांना प्राधिकृत करुन बेडगाव पोलीस मदत केंद्रात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलीस मदत केंद्रात उपविभागीय अभियंता, कनिष्ठ अभियंता व कंत्राटदार यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. कोरचीचे प्रभारी पोलीस अधिकारी विनोद गोडबोले यांच्या मार्गदर्शनात पीएसआय नीतेश पोटे करीत आहेत.जंगलातील बांधकामांची चौकशी करण्याची मागणीजलयुक्त शिवार अभियानअंतर्गत कोरची तालुक्यातील पड्यालजोग, हेटाळकसा, खसोडा, काडे व हुडुकदुम्मा या गावांमध्ये सुमारे १६ बंधारे बांधले आहेत. जिल्ह्याच्या इतरही तालुक्यांमध्ये शेकडो बंधारे बांधले आहेत. यातील बहुतांश बंधारे जंगल भागात आहेत. यातील बहुतांश बंधारे निकृष्ट असल्याने त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर