मिरची तोडायला जाणाऱ्या मजुरांच्या वाहनाला आष्टीजवळ अपघात, 5 गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2022 05:56 PM2022-01-22T17:56:38+5:302022-01-22T17:56:58+5:30

Gadchiroli : सदर वाहन हे मध्यप्रदेशातून तेलंगना राज्यात मिरची तोड मजुराना घेऊन जात असल्याचे सांगण्यात आले. 

Accident near Ashti, 5 seriously injured in Gadchiroli | मिरची तोडायला जाणाऱ्या मजुरांच्या वाहनाला आष्टीजवळ अपघात, 5 गंभीर जखमी

मिरची तोडायला जाणाऱ्या मजुरांच्या वाहनाला आष्टीजवळ अपघात, 5 गंभीर जखमी

Next

आष्टी : आष्टी-चामोर्शी मार्गावरील आष्टी पासून २ किलोमीटर असलेल्या अनखोड़ा नाल्याजवळील वळणावर क्रूजर वाहनाचा भीषण अपघातात २० जण झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सदर घटना आज सकाळी 5.30 च्या सुमारास घडली. 

गडचिरोलीवरून आष्टीकडे जाणाऱ्या गाडी क्र सी जी ०९ जे जे ४८०० ने अनखोडा जवळील वळणावर चालकचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन २०० मीटर दूर जाऊन खड्यात पलटली त्यामुळे वाहनात १७ मिरची तोड मजूर तर चालक क्लीनर व इतर एक असे एकूण २० जण होते. सदर वाहन हे मध्यप्रदेशातून तेलंगना राज्यात मिरची तोड मजुराना घेऊन जात असल्याचे सांगण्यात आले. 

सकाळी मॉर्निंगवॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांना हा अपघात लक्षात आला शिक्षक संतोष नागरगोजे व इतर नागरिकांनी जखमींना वाहनातून बाहेर काढले तसेच आष्टी पोलिसांना सूचना देण्यात आली. तात्काळ पोलीस उपनिरीक्षक गणेश जंगले, महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली कांबळे, राजू पंचफुलिवर, फुंडगिर आदि आष्टी पोलीस कर्मचारी घटनास्थळावर पोहचून जखमींना आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराठी दाखल करण्यात आले तर सामाजिक कार्यकर्ता संजयभाऊ पंदिलवार यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमींना विचारपुस करुण त्यांच्या प्रसांगावधान राखत गंभीर जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपुर येथे रेफर करण्यासाठी दोन १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची व्यवस्था करुन दिली. 

सदर अपघातात जखमी झालेल्यांची नावे...
1) चालक दिनेशकुमार परते, वय  23, रा. उमरिया, जिल्हा मंडला 
2) आशा इन्द्रेश कोडापे, वय 29, रा. पातादेई, जिल्हा मंडला 
3) ढगेरु बत्तु हरीसिंग यादव, वय 18, रा. बनियातारा, जिल्हा मंडला 
4) जानकी शिवप्रसाद मारकु, वय 29, रा. सहेपरा, जिल्हा डिंडोरी 
5) मीनाबाई प्रितमदास बगेल, वय 34, रा. बनियातारा, जिल्हा मंडला 
6) गणपतियाबाई सीताराम सङको, वय 45, रा. बनियातारा, जिल्हा मंडला 
7) अर्चना गंगाराम पंदराम, वय 26, रा. बनियातारा, जिल्हा मंडला 
8) चेतराम भड्डूसिंग मसराम, वय 53, रा. उमरिया, जिल्हा मंडला 
9) सांबति मौली मात्रामा, वय 34, रा. उमरिया, जिल्हा मंडला 
10) रामसिंग झमलूसिंग धुर्वे, वय 35, रा. पढाधार, जिल्हा मंडला 
11) रामचरण काशीराम नरते, वय 45, रा. उमरिया, जिल्हा मंडला 
12) रामबत्ती रामप्यारे धुर्वे, वय 30, रा. पढाधर, जिल्हा मंडला 
13) शिवचरण काशीराम नरते, वय 30, रा. उमरिया, जिल्हा मंडला 
14) सीताराम भैयालाल सोनवणे, वय 50, रा. बनियातारा, जिल्हा मंडला 
15) संतोषी बुधुलाल यादव, वय 18, रा. बनियातारा, जिल्हा मंडला 
16) वसंत हरिलाल वयाम, वय 26, रा. मंगवानी, जिल्हा मंडला 
17)निरंता रामचरण नरते, वय 17, रा. उमरिया जिल्हा मंडला 
18) रौशनी मौली वयाम, वय 14, रा. अवरालि, जिल्हा मंडला 
19) इन्द्रेश कमलसिंग कोडापे, वय 21, रा. उमरिया, जिल्हा मंडला 
20) इन्द्रेशकुमार पंखुसिंग कोडापे, वय 22, रा. मोहगाव, जिल्हा मंडला.

Web Title: Accident near Ashti, 5 seriously injured in Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.