शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
3
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
4
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
5
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
6
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
7
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
8
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
9
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
10
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
11
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
12
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
13
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
14
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
15
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
17
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
18
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
19
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
20
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत स्वत:हून पोस्टींग घेणारे बीडचे भूमिपुत्र पाखरे आयएएस; पहिल्याच प्रयत्नात यश

By संजय तिपाले | Updated: April 16, 2024 17:05 IST

निवडणूक कर्तव्यावर असताना 'गुड न्यूज'.

संजय तिपाले, गडचिरोली : माओवादग्रस्त गडचिरोलीत नियुक्ती म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दृष्टीने शिक्षा समजली जाते, पण अतिदुर्गम भागात सेवेची संधी स्वत:हून मागणारे बीडचे भूमिपुत्र व गटविकास अधिकारी अभिजित पाखरे यांनी युपीएससी २०२३ च्या नागरी सेवा परीक्षेत यश संपादन केले आहे. १६ एप्रिलला दुपारी ही 'गुड न्यूज' कळाली  तेव्हा पाखरे हे अतिदुर्गम अहेरीत निवडणूक कर्तव्य बजावत होते.

अभिजित गहिनीनाथ पाखरे हे मूळचे शिरुर कासार तालुक्यातील पाडळी (जि. बीड) येथील आहेत. त्यांचे आई- वडील शिक्षक आहेत. त्यामुळे घरात शिक्षणाचे वातावरण होते. खासगी शाळेत शिक्षक असलेले वडील ग्रामपंचायतीचे सरपंचही आहेत. २०१९ मध्ये त्यांनी एमपीएससीची परीक्षा दिली व पहिल्याच प्रयत्नात उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा गटविकास अधिकारी या पदासाठी त्यांची निवड झाली. प्रशिक्षण पूर्ण केल्यावर नाशिकच्या येवला येथे प्रशिक्षणार्थी गटविकास अधिकारी म्हणून काम केल्यावर त्यांची नियमित पहिली नियुक्ती होणार होती. आदिवासीबहुल, मागास व अतिदुर्गम भागातून प्रशासकीय सेवेचा 'श्रीगणेशा' करण्याच्या हेतूने त्यांनी प्रधान सचिवांना पत्र लिहून गडचिरोलीत पोस्टींग द्या, अशी विनंती केली होती. त्यानुसार त्यांना गडचिरोलीच्या अहेरी या अत्यंत संवेदनशील ठिकाणी गटविकास अधिकारी म्हणून नेमले होेते. १३ मार्च २०२४ पासून ते अहेरीत कर्तव्य बजावत होते. दरम्यान, त्यांनी २०२३ मध्ये युपीएससी २०२३ च्या नागरी सेवा परीक्षाही दिली होती. यात ७२० व्या क्रमांकाने ते उत्तीर्ण झाले. या यशाबद्दल त्यांच्यावर कौतुकाच वर्षाव होत आहे.असा राहिला शैक्षणिक प्रवास...

अभिजित पाखरे यांनी गावातील जि.प. शाळेत चौथीपर्यंत शिक्षण घेतले. पुढे पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण बीडच्या चंपावती विद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी पदवी संपादन केल्यावर राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. आधी एमपीएससी व नंतर युपीएससी क्रॅक करत बीडचा झेंडा फडकावला.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली